राज्याच्या उपराजधानीत नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना होत असतानाच्या पार्श्वभूमीवर मांजामुळे मेट्रो गाडी थांबवण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. यासंदर्भात एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्यानुसार बर्डी ते हिंगणा मार्गावरील लोकमान्य नगर मेट्रो स्थानकावर नॉयलॉन मांजामुळे मेट्रो थांबल्याचा दावा करण्यात आला आहे. नायलॉन मांजा विक्रीला नागपुरात बंदी आहे. विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे.
हेही वाचा >>>नागपूर: विदर्भात मुलींसाठी हक्काचे अनुरक्षण गृह नाही; बालगृहात १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींची अडचण
बाळगणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. मेट्रोच्या मार्गिका या पिल्लरवर आहे. तेथील ओहरहेड वायरवर नेहमी मांजा पडलेला असतो, पंतगही अडकलेल्या असतात, त्या काढताना विद्युत धक्का बसण्याचा धोका असल्याने महामेट्रोकडून नागरिकांना सावध केले जाते. मात्र तारांवर पडलेल्या मांजामुळे मेट्रोच्या संचालनातही अडचणी येत असल्याचे लोकमान्यनगर मार्गावर झालेल्या प्रकाराने उघड झाले आहे.