scorecardresearch

Premium

‘मिनी विरप्पन’ची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना सलामी!; जिल्हा कचेरीतील चंदनाचे झाड नेले कापून

नूतन जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना चंदन तस्करांनी आज अनाधिकृत सलामी दिली! या बहाद्दरांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील चंदनाचे जुने झाड लंपास करून खळबळ उडवून दिली.

Sandalwood tree was taken and cut

बुलढाणा : नूतन जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना चंदन तस्करांनी आज अनाधिकृत सलामी दिली! या बहाद्दरांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील चंदनाचे जुने झाड लंपास करून खळबळ उडवून दिली. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी नुकतेच तर पालकमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी आज गुरुवारी सूत्रे स्वीकारली. पालकमंत्र्यांच्या स्वागताची यंत्रणा तयारी करीत असताना या अजब चोरीची बाब उघड झाली. यामुळे अधिकाऱ्यांनी डोक्याला हात मारून घेतला.

जिल्हाधिकारी कक्षा समोरील उद्यानात  हे झाड चोरी गेले आहे. झाडाचे अंदाजे वय २५ वर्षांचे होते व  त्यात सुमारे १० किलो गाभा निघाला असावा असा अनाधिकृत अंदाज आहे. शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यामुळे जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रवेशद्वारातच पोलीस कक्ष आहे. यावर कळस म्हणजे रस्ता ओलांडला की, पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय किती सुरुक्षित? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  यामुळे  तत्काळ तपासाचे  आव्हान  ठाणेदार काटकर यांच्या समक्ष उभे ठाकले आहे.

Chandrapur district, BJP executive, sudhir Mungantiwar, Hansraj Ahir
चंद्रपूर जिल्हा भाजप कार्यकारिणीवर मुनगंटीवारांचे वर्चस्व, हंसराज अहीर समर्थकांना डावलल्याने नाराजी
ec orders immediately suspend three senior officials in evm theft case
पुणे: मतदान यंत्रे चोरी प्रकरण तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना भोवले
Ahmednagar lawyers gate Collector office
नगरमध्ये मोर्चेकरी वकील चढले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर; फेकल्या पाण्याच्या बाटल्या!
BJP Dindori Gaon Chalo Campaign
गाव चलो अभियानात भाजपचे दिंडोरी मतदारसंघावर लक्ष; मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांचा ३०० गावांत मुक्काम

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mini veerappan salute to guardian minister and district collector sandalwood tree was taken and cut scm 61 ysh

First published on: 05-10-2023 at 15:40 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×