सूरजागड लोहखाणीतून होणाऱ्या जडवाहतुकीसाठी 'माइनिंग कॉरिडॉर' - पालकमंत्री फडणवीस | Mining Corridor for heavy traffic from Surjagad Iron Mine Guardian Minister Fadnavis amy 95 | Loksatta

सूरजागड लोहखाणीतून होणाऱ्या जडवाहतुकीसाठी ‘माइनिंग कॉरिडॉर’ – पालकमंत्री फडणवीस

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोहखाणीतून कच्चा माल विविध ठिकाणी घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे त्या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

सूरजागड लोहखाणीतून होणाऱ्या जडवाहतुकीसाठी ‘माइनिंग कॉरिडॉर’ – पालकमंत्री फडणवीस
उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली : राज्यातील बहुचर्चित सूरजागड लोहखाणीतून होणाऱ्या जड वाहतुकीसाठी ‘माइनिंग कॉरिडॉर’ अथार्त विशेष खाण मार्गीका तयार करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच जिल्हा नियोजनाच्या बैठकीसाठी येथे आले होते.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंचे भाषण मला ऐकायचे नाही, कारण….”; राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोहखाणीतून कच्चा माल विविध ठिकाणी घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे त्या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. धूळ, खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि दररोज होणारे अपघात यामुळे दक्षिण गडचिरोलीतील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. नुकतेच शांतीग्रामजवळ अवजड वाहनाच्या धडकेत एका महिलेला जीव गमवावा लागला होता. यावेळी संतप्त नागरिकांनी ८ वाहनांची जाळपोळ केली होती. हा असंतोष शमवण्यासाठी फडणवीसांनी शनिवारी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत ‘माइनींग कॉरिडॉर’ ची घोषणा केली. यामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी होणार असे फडणवीस यांनी सांगितले. सोबतच कोनसरी येथील प्रकल्प एप्रिलमध्ये कार्यरत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> नागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालय परिसरात अखेर प्रभातफेरी बंद; उच्च न्यायालयाचा निर्णय

बैठकीत जिल्ह्यातील वन्यजीव व मानव संघर्ष, सिंचन, रस्ते याबाबत प्रलंबित असलेली कामे तत्काळ मार्गी लावा, असे आदेश फडणवीस यांनी दिले. जिल्हा नियोजनाच्या ५०० कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या विविध विकासात्मक कामाबाबतदेखील चर्चा झाली. बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, विधान परिषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, उप पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.

हेही वाचा >>> डॉ. सुधीर गुप्ता यांची उचलबांगडी ! १७ वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणात कारवाई

पोलिसांच्या दीडपट वेतनाचा मुद्दा मार्गी
सहा महिन्यांपासून गडचिरोली पोलिसांना लागू असलेले दीडपट वेतन बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेक पोलिसांवर आर्थिक संकट कोसळले होते. ‘लोकसत्ता’ने याविषयी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची तत्काळ दाखल घेत पालकमंत्री फडणवीस यांनी प्रलंबित वेतन नियमित करण्यात येणार असल्याचे सांगितले. येत्या सोमवारी त्यासंदर्भातील शासन आदेश निघेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“उद्धव ठाकरेंचे भाषण मला ऐकायचे नाही, कारण….”; राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

संबंधित बातम्या

“अजित पवारांनी उंचीचा विचार करून बोलावं”; राज्यपालांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
सावधान..!‘भलत्याच’ संकेतस्थळांवर मुलींचे फोटो होतात अपलोड, ‘डीपी’वर सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी
पीक विम्याची रक्कम तुटपुंजी; रविकांत तुपकरांनी गाठले कृषी अधीक्षक कार्यालय, अन् मग…
भंडाऱ्यात रानटी हत्तींची घुसखोरी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
किशोरावस्थेतील ७० टक्के मुले पोर्नोग्राफीच्या विळख्यात

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे शहरात रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल; मागणी पूर्ण होईपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा निर्धार
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बहिणीला तेलंगणात अटक, गाड्यांचीही जाळपोळ; काय आहे प्रकरण?
निधीअभावी पुणे जिल्हा परिषदेच्या अत्याधुनिक अभिलेख कक्षाचे काम रखडले
Fifa World Cup 2022: मेस्सी-रोनाल्डोचे संघ होणार बाहेर? विश्वचषकाचे फसले गणित, जाणून घ्या समीकरण
यामी गौतमचा ‘लॉस्ट’ हा थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित