scorecardresearch

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनीही समाजमाध्यमांवर ठेवले ‘मी सावरकर’ लिहिलेले छायाचित्र

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सर्व समाज माध्यमावरील प्रोफाईलमध्ये सावकरांचे छायाचित्र लावले आहे. यामध्ये सावरकरांचे छायाचित्र व छायाचित्रावर ‘मी सावरकर’, असे लिहले आहे.

Minister Mungantiwar picture Me Savarkar
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनीही समाजमाध्यमांवर ठेवले ‘मी सावरकर’ लिहिलेले छायाचित्र (image – social media)

चंद्रपूर : विनायक दामोदर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना भाजपाच्या नेत्यांनी समाजमाध्यमावरील प्रोफाईल छायाचित्र बदलवून सावकरांचे छायाचित्र लावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ वनमंत्री तथा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा आपल्या सर्व समाज माध्यमावरील प्रोफाईलमध्ये सावकरांचे छायाचित्र लावले आहे. यामध्ये सावरकरांचे छायाचित्र व छायाचित्रावर ‘मी सावरकर’, असे लिहले आहे.

नुकतेच शिंदे गटाने सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी व विरोधकांना घेरण्यासाठी अत्यंत आक्रमक मोहीम भाजपाने हाती घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इतक्यावरच न थांबता आपल्या ट्विटर हँडलवरील प्रोफाईल छायाचित्र बदलविले आहे. या छायाचित्रात सावरकरांचा फोटो लावला असून त्यावर ‘आम्ही सारे सावरकर’ असं लिहिलं आहे.

हेही वाचा – नागपूर : ‘सकाळचा भोंगा’ बंद करा! बावनकुळेंनी राऊतांना पुन्हा डिवचले

हेही वाचा – अकोला : मुलगी झाली म्हणून छळ; आईने संपविले जीवन, पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा

त्यापाठोपाठ मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरचे प्रोफाईल छायाचित्र बदलवून ‘आम्ही सावरकर’ लिहलेले छायाचित्र लावले आहे. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी आपले प्रोफाईल छायाचित्र बदलवून सावरकरांचा फोटो ठेवलेला आहे. वने, सांस्कृतिक तथा चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा फेसबुकवरील छायाचित्र बदलवून ‘मी सावरकर’ लिहलेले सावरकरांचे छायाचित्र लावले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 14:26 IST

संबंधित बातम्या