नागपूर : गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या सिंह आणि सिंहिणीची जोडी मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात बोरिवली येथील वाघ आणि वाघीण जुनागढ येथे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा व सुधीर मुनगंटीवार यांच्यात सोमवार, २६ सप्टेंबरला अहमदाबाद येथे याबाबत चर्चा झाली.

या प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये व जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात चर्चा झाली होती.४ एप्रिल २०२२ ला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे संचालक जी. मल्लिकर्जून यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली व कार्यवाही सुरू केली होती. त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे राज्यमंत्री विश्वकर्मा यांनी सोमवारी २६ सप्टेंबरला विस्तृत चर्चा केली. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळवण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले.

Gulab Barde, Maharashtra Kesari,
दिंडोरीत वंचितकडून ‘महाराष्ट्र केसरी’ मैदानात
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Aditya Thackeray Yavatmal
‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका
lok sabha elections 2024 bjp udayanraje bhosale confirmed from satara lok sabha constituency
Lok Sabha Elections 2024 : साताऱ्याच्या बदल्यात नाशिक? भाजप-राष्ट्रवादीत अलिखित करार, शिवसेनेत अस्वस्थता