minister sudhir mungantiwar lion of Gujarat will come Maharashtra and tiger of Maharashtra will go to Gujarat | Loksatta

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार : सुधीर मुनगंटीवार

गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा व सुधीर मुनगंटीवार यांच्यात सोमवार, २६ सप्टेंबरला अहमदाबाद येथे याबाबत चर्चा झाली.

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार : सुधीर मुनगंटीवार
प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूर : गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या सिंह आणि सिंहिणीची जोडी मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात बोरिवली येथील वाघ आणि वाघीण जुनागढ येथे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा व सुधीर मुनगंटीवार यांच्यात सोमवार, २६ सप्टेंबरला अहमदाबाद येथे याबाबत चर्चा झाली.

या प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये व जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात चर्चा झाली होती.४ एप्रिल २०२२ ला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे संचालक जी. मल्लिकर्जून यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली व कार्यवाही सुरू केली होती. त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे राज्यमंत्री विश्वकर्मा यांनी सोमवारी २६ सप्टेंबरला विस्तृत चर्चा केली. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळवण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-09-2022 at 09:24 IST
Next Story
गोमूत्र उपचाराद्वारे गुरे ‘लम्पी’मुक्त! ; नागपूर जिल्ह्यातील गो-विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांचा दावा