बुलढाणा : महाविकास आघाडीत राज्यपातळीवर मोठा भाऊचा वाद, वादंग रंगला असतानाच काँग्रेसने स्वतःला मोठा भाऊ गृहीत धरल्याचे चित्र आहे. भाजपाचे जगजाहीर मिशन- ४५ एक वर्षापासून गाजत असतानाच आता काँग्रेसचे अघोषित मिशन -४२ समोर आले आहे. आज २ जूनच्या मुहूर्तावर मुंबईत या मिशनचा प्रारंभ होत असून टिळक भवन येथे प्रदेश समिती व दिग्गज नेते जिल्हा निहाय स्थानिक नेत्यांशी विचारमंथन व खलबते करणार आहे.

विदर्भातील १० लोकसभा मतदारसंघापासून या महत्वाकांक्षी मोहिमेचा प्रारंभ होत असून, बुलढाणा मतदारसंघापासून आज व उद्या आयोजित या मॅरेथॉन बैठकीचा श्री गणेशा होणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघावरील बैठक दुपारी २ वाजता लावण्यात आली आहे.

East Nagpur, Congress, booth planning,
पूर्व नागपुरात काँग्रेसची यंत्रणा तोकडी, बूथ नियोजनात ढिसाळपणा; स्थानिक नेत्यांऐवजी….
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…
Sangli Lok Sabha candidacy Congress workers focus on Delhi decision
सांगली लोकसभा उमेदवारी काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष दिल्लीच्या निर्णयाकडे
Challenge of two women candidates before Asaduddin Owaisi
ओवैसींसमोर यंदा दोन महिला उमेदवारांचे आव्हान; कसा राखणार हैदराबाद मतदारसंघ?

हेही वाचा – चंद्रपूर : नदीपात्रात आढळले मानवी सांगाडे; कुठे आणि कसा घडला हा प्रकार? वाचा सविस्तर..

कोअर समिती दाखल

आघाडीत राष्ट्रवादी अन महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या बुलढाण्यावर काँग्रेसने हक्क सांगितला आहे. काँग्रेस वर्तुळात ज्येष्ठ नेते खासदार मुकुल वासनिक यांचा मतदारसंघ (जिल्हा) म्हणून बुलढाण्याची ‘व्हीआयपी’ ओळख आहे. यामुळे या मागणीला वेगळे महत्त्व आहे. बुलढाण्यावरील हक्क गंभीरतेने मांडण्यासाठी जिल्हा ‘कोअर’ समिती गठीत करण्यात आली. या समितीची गुप्त बैठक बुलढाण्यात कालपरवा पार पडली. यात आजच्या बैठकीचे नियोजन, संख्याबळ अकडेवारीसह प्राथमिक अहवाल, मुंबई बैठकीचे मुद्दे व सादरीकरण यावर मंथन झाले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा हक्क सांगण्याचा अनौपचारिक ठराव मंजूर करण्यात आला. काही इच्छुक नावावर चर्चादेखील झाली. आज दुपारी २ वाजता मुंबई येथील टिळक भवनात प्रदेश काँग्रेस समिती व मातब्बर नेत्यांसमवेत गाभा समिती सदस्य विस्तृत चर्चा करणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, समिती सदस्य लक्ष्मण घुमरे, श्याम उमाळकर, हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे, ज्ञानेश्वर पाटील, मनोज कायंदे, मनीषा पवार, स्वाती वाकेकर, रामविजय बुरुंगले आदी आज सकाळी मुंबईत दाखल झाले आहे. बुलढाणानंतर विदर्भातील अन्य नऊ मतदारसंघावर खलबते होणार आहे.