scorecardresearch

Premium

भंडारा : आमदार भोंडेकर-परिणय फुकेंमध्ये धुसफूस! आजी आमदाराने माजी आमदाराचे नाव घेणे टाळले

आमदार भोंडेकर हे फुकेंचे नाव घेण्यास विसरले की जाणीवपूर्वक त्यांनी ते टाळले, याबाबत कार्यक्रमस्थळी दबक्या आवाजात चर्चा रंगू लागली.

MLA Bhonde and Parinay Fuke tussle
भंडारा : आमदार भोंडेकर-परिणय फुकेंमध्ये धुसफूस! आजी आमदाराने माजी आमदाराचे नाव घेणे टाळले (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

भंडारा : राज्यपाल रमेश बैस सध्या विदर्भ दौऱ्यावर असून आज शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास ते उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार भोंडेकर यांनी बोलताना मंचावर उपस्थित सर्वांची नावे घेतली, मात्र माजी आमदार डॉ. परिणय फुके यांचे नाव घेण्यास ते विसरले. आमदार भोंडेकर हे फुकेंचे नाव घेण्यास विसरले की जाणीवपूर्वक त्यांनी ते टाळले, याबाबत कार्यक्रमस्थळी दबक्या आवाजात चर्चा रंगू लागली.

हेही वाचा – बुलढाणा मतदारसंघासाठी ५१ कोटींचा निधी, न्यायाधीशांची निवासस्थाने, रस्ते कामांना मिळणार गती

Jayant Patil son
जयंत पाटील यांना मुलाच्या राजकीय भवितव्याची काळजी
ajit pawar jitendra awhad (1)
“संसदेत भाषणाची वेळ आली की अजित पवार बाथरूममध्ये जाऊन…”, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
amruta fadnavis devendra fadnavis (1)
“ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण…”, अमृता फडणवीसांनी घेतलेल्या उखाण्याची चर्चा; नागपुरातील कार्यक्रमात लावली हजेरी!
Ajit Pawar Supriya Sule
“इथून पुढे माझ्या विचारांचा खासदार…”, अजित पवारांनी बारामतीत रणशिंग फुंकलं; म्हणाले, “इतके दिवस…”

हेही वाचा – बंदी असतानाही नॉयलॉन मांजाची सर्रास विक्री, अकोल्यात महिलेचा पाय…

जिल्ह्यातील संरक्षण सेवा अकादमी, शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस आणि पालकमंत्री डॉ. गावित यांच्यासह आमदार आणि खासदारसुद्धा मंचावर उपस्थित होते. आमदार भोंडेकर यांना सर्वप्रथम बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांकडे बघून त्यांची नावे घेतली मात्र समोरच बसलेल्या डॉ. फुके यांचे नाव त्यांनी घेतलेच नाही. ही बाब अनेकांच्या लक्षात आली. यावरून आजी आणि माजी आमदारांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगू लागली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mla bhonde and parinay fuke tussle mla refrained from taking the former mla name ksn 82 ssb

First published on: 08-12-2023 at 13:48 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×