चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकारने आठ वर्षांच्या कार्यकाळात अनेक जनविरोधी निर्णय घेतले आहेत. देशातील वाढत्या महागाईने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. हाताला काम नसल्याने बेरोजगार युवा वर्ग नैराश्यात आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. छोटे-मोठे व्यापारी असंख्य समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा खरा चेहरा शहर कॉग्रेसने चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून उघड करित मोदी सरकारची पोलखोल केली आहे.

जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या पुढाकारातून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता. २१) चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. काँग्रेसचे खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात देशात भारत जोडो यात्रा काढण्यात आली. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने दुसरा टप्पा म्हणून हाथ से हाथ जोडो अभियान सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारची जनविरोधी धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. शहरातील कस्तुरबा चौकात चित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या वित्तीय संस्थांमध्ये देशातील सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे. परंतु, केंद्रातील मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवला आहे.

pension for government employees
लेख : सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष
२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
EPS-95 pensioner
इपीएस-९५ पेन्शनधारक भाजपवर नाराज, म्हणाले, “विरोधात…”

हेही वाचा >>> भंडाऱ्यात इंग्रजीचा पेपर पाहून विद्यार्थीनी झाली बेशुद्ध; ‘कॉपी मुक्त’सोबतच ‘ताण मुक्त’ अभियानही राबवण्याची गरज!

अदानी समूहातील गैरकारभारामुळे गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये परत मिळतील का, अशी भीती निर्माण झाली आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा किंवा सरकारमधील कोणताही मंत्री यावर बोलायला तयार नाही. देशातील गरिबी कमी झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. तर, दुसरीकडे देशातील जनतेला फुकट धान्य देण्याचा अर्थ काय होतो, असा सवाल खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी उपस्थित केला. केंद्रातील मोदी सरकारने अनेक जनविरोधी धोरणे राबविली आहेत. त्यामुळे देशातील सर्वच घटक आजघडीला अनेक अडचणींना तोंड देत आहेत.

हेही वाचा >>> यवतमाळ : त्याने दगा दिला, तिने विष प्राशन करून गर्भातील बाळासह जीव दिला!

त्यामुळे अखिल भारतील काँग्रेस कमिटीने सुरू केलेल्या हाथ से हाथ जोडे अभियानांतर्गत चित्र प्रदर्शनातून मोदी सरकारची चुकीची धोरणे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी सांगितले. खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनात हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनीतून मोदी सरकारने चालविलेला आर्थिक घोळ, तथा सर्वसामान्य जनतेची लुट अतिशय प्रभाविपणे दाखविण्यात आली आहे.