राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी “आपल्या समाजात आधीपासून एलजीबीटीक्यू समूह (LGBTQ+) आहे,” असं मत व्यक्त केलं. तसेच आपण जनावरांचे डॉक्टर असल्याचं सांगत जनावरांमध्येही एलजीबीटीक्यूप्रमाणे प्रकार असतात, असं म्हटलं. ते ९ जानेवारीला संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर त्यांची मतं मांडली.

मोहन भागवत म्हणाले, “मी जनावरांचा डॉक्टर आहे. जनावरांमध्येही एलजीबीटीप्रमाणे प्रकार असतात. ही एक बायोलॉजिकल अवस्था आहे. एलजीबीटी समूह त्याचाच भाग आहे. मात्र, त्याचा फार मोठा प्रश्न तयार करण्यात आला. तेही समाजाचा भाग आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांचा एक खासगी अवकाशही मिळावा आणि त्यांना इतर समाजाप्रमाणे आम्हीही आहोत असं वाटावं असा सहभागही करता यावा.”

Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”
वीस वर्षे ‘ज्या’ व्यक्तीविरोधात संघर्ष केला तिलाच राष्ट्रवादीने आयात केलं, साहजिकच विलास लांडे नाराज होतील – अमोल कोल्हे

“आपली परंपरा एलजीबीटी समुहाची व्यवस्था करत आली आहे”

“आपली परंपरा कोणताही आरडाओरडा न करता एलजीबीटी समुहाची व्यवस्था करत आली आहे. असाच विचार पुढेही करावा लागेल. कारण इतर गोष्टींनी उत्तर सापडलेलं नाही आणि सापडणारही नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे संघ आपल्या अनुभवाला विश्वासार्ह मानून काम करत आहे,” असं भागवत यांनी सांगितलं.

“आपल्या समाजात आधीपासून एलजीबीटी समूह”

मोहन भागवत पुढे म्हणाले, “काही लहान लहान प्रश्न मध्ये मध्ये येत असतात. मात्र, माध्यमं त्या प्रश्नांना फार मोठं करून दाखवतात. कारण कथिक नव्या डाव्या विचाराच्या लोकांना ती गतिशीलता वाटते. तो प्रश्न म्हणजे एलजीबीटीचा प्रश्न. मात्र, हा प्रश्न आजचा नाही. आपल्या समाजात आधीपासून हे समूह आहेत, पण आजपर्यंत कधी त्यांचा आवाज झाला नाही. ते लोक जगत राहिले.”

“आपल्या समाजाने एलजीबीटी समूहाला सह्रदयपणे स्वीकारलं”

“आपल्या समाजाने विना आरडाओरडा करता एलजीबीटी समूहाला सह्रदयपणे स्वीकारलं. तेही एक जीव आहेत आणि त्यांनाही जीवन जगायचं आहे हा विचार करून त्यांना समाजात सामावून घेण्याचा एक मार्ग काढला. आपल्या समाजात तृतीयपंथी लोकांना जागा आहे. तृतीयपंथी हा प्रश्न नाही, तर तो एक समूह आहे. त्यांचे देवी-देवताही आहेत. सध्या तर त्यांचे महामंडलेश्वरही आहेत. ते कुंभात येतात आणि त्यांना तेथे जागाही मिळते,” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

“आपल्या परंपरेत एलजीबीटी समुहाला सामावून घेतलं आहे”

भागवत पुढे म्हणाले, “एलजीबीटी समूह समाजाचा भाग आहेत. घरात बाळाचा जन्म झाल्यावर ते गाणं म्हणायला येतात. परंपरेत त्यांना सामावून घेतलं आहे. त्याचं जगणं वेगळंही सुरू असतं आणि काही ठिकाणी ते समाजाशीही जोडले जातात. आम्ही त्यावर कधी आरडाओरडा केला नाही. आम्ही त्याला आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय केलं नाही. असाच एलजीबीटीचा प्रश्न आहे.”

“जरासंधाच्या दोन्ही सेनापतींमध्ये एलजीबीटीप्रमाणे संबंध”

“जरासंधाचे दोन सेनापती होते. हंस आणि डिंभक. ते इतके मित्र होते की कृष्णाने अफवा पसवली की, डिंभकाचा मृत्यू झाला, तर हंसाने आत्महत्या केली. त्यांनी दोन सेनापतींना असं मारलं. त्या दोघांचे असेच एलजीबीटीप्रमाणे संबंध होते. आपल्याकडे हा समूह होताच. माणूस निर्माण झाला तेव्हापासून एलजीबीटी हा माणसाचा एक प्रकार आहेच,” असंही भागवतांनी नमूद केलं.

हेही वाचा : ‘इतर देशांचे अनुकरण करून आपण आत्मनिर्भर होणार नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

दरम्यान, याआधी चार वर्षांपूर्वीही मोहन भागवत यांनी एलजीबीटी समाजाबद्दल अशीच भूमिका व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, “एलजीबीटी समुदायाचे लोक हिंदू परंपरेमध्येही होते. ते समाजाचाच भाग आहे. त्यांची व्यवस्था करण्याचं काम समाजाने करायला हवं. आपल्या परंपरेत, आपल्या समाजात एलजीबीटी समुदायाची व्यवस्था करण्याचं काम झालेलं आहे. आता काळ बदलला आहे, तर त्यासाठी वेगळी व्यवस्था तयार करावी लागेल.”