वीजबिल ‘अपडेट’ न केल्यास वीजकपात करण्यात येणार असल्याचा संदेश एका ग्राहकाला पाठवण्यात आला. ग्राहकाने संदेशातील ‘लिंक’ उघडताच खात्यातून सायबर गुन्हेगाराने २.१४ लाख रुपये परस्पर हडपले. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नागपूर : अजित पारसेचा व्यसनमुक्ती केंद्रात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

प्रवीण अजाबराव उमक (श्रीरामनगर) यांना ३० एप्रिल २०२२ ला मोबाईलवर एक संदेश आला. त्यात वीजबिल ‘अपडेट’ करा, अन्यथा कंपनीच्यावतीने वीज कापण्यात येईल, असे लिहिले होते. त्यामुळे संदेशात दिलेली ‘लिंक’ प्रवीण यांनी उघडली. त्यात ‘पीएमव्ही’ नावाचे ‘ॲप’ डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. ते ‘ॲप’ ‘डाऊनलोड’ करून बँक खात्याची माहिती भरण्यास सांगण्यात आली. त्यानंतर प्रवीण यांच्या खात्यातून २ लाख १४ हजार रुपये परस्पर काढण्यात आले. त्यामुळे त्यांना धक्का बसला. त्यांनी ‘ॲप’मध्ये दिलेल्या क्रमांकावर फोन करूनही काही फायदा झाला नाही. पैसे परत न आल्यामुळे त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

हेही वाचा >>>नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी ४८७ कोटी, जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या अनेकांना संदेश पाठवत असून त्यात ‘लिंक’ पाठवत आहेत. त्यामध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केल्यास किंवा ‘लिंक’ उघडल्यास सायबर गुन्हेगार खात्यातून पैसे लंपास करीत आहेत. त्यामुळे वीजबिल किंवा मीटरसंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास ग्राहकांनी थेट कार्यालयात जाऊन शहानिशा करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money stolen from electricity customer bank account through message link amy
First published on: 19-10-2022 at 10:04 IST