नागपूर : मान्सून सक्रिय झाला असून तो आज केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे. अंदामानमध्ये तो बराच काळ रेंगाळला होता. आता मात्र त्याने वेग पकडलाय.

मान्सून नैऋत्येकडे वेगाने सरकत असल्याने आजच तो केरळच्या किनारपट्टीला धडक देऊ शकतो. भारतीय हवामान खात्याने चार जूनला मान्सून येईल, असा अंदाज दिला होता. तो अचूक ठरण्याची शक्यता आहे. सक्रीय झालेला मान्सून मालदीव समुद्रातून अरबी समुद्रात दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – नागपूर : बालासोर रेल्वे अपघातानंतर कोणती गाडी रद्द, कोणत्या गाड्यांना उशीर? जाणून घ्या…

मान्सून आज केरळात दाखल झाल्यास कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार पूर्वमान्सून सरी कोसळतील. महाराष्ट्रात दहा जूनला पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभगाने वर्तविली आहे. राज्यात जून, जुलैमध्ये कमी पाऊस, तर ऑगस्ट महिन्यात साधारण पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Story img Loader