Premium

अंदमानमध्ये रेंगाळलेला मान्सून आज केरळमध्ये धडकणार! महाराष्ट्रात दहा जूनला पावसाचे आगमन

मान्सून सक्रिय झाला असून तो आज केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे.

rain Maharashtra June 10
अंदमानमध्ये रेंगाळलेला मान्सून आज केरळमध्ये धडकणार! महाराष्ट्रात दहा जूनला पावसाचे आगमन (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : मान्सून सक्रिय झाला असून तो आज केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे. अंदामानमध्ये तो बराच काळ रेंगाळला होता. आता मात्र त्याने वेग पकडलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मान्सून नैऋत्येकडे वेगाने सरकत असल्याने आजच तो केरळच्या किनारपट्टीला धडक देऊ शकतो. भारतीय हवामान खात्याने चार जूनला मान्सून येईल, असा अंदाज दिला होता. तो अचूक ठरण्याची शक्यता आहे. सक्रीय झालेला मान्सून मालदीव समुद्रातून अरबी समुद्रात दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

हेही वाचा – नागपूर : बालासोर रेल्वे अपघातानंतर कोणती गाडी रद्द, कोणत्या गाड्यांना उशीर? जाणून घ्या…

मान्सून आज केरळात दाखल झाल्यास कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार पूर्वमान्सून सरी कोसळतील. महाराष्ट्रात दहा जूनला पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभगाने वर्तविली आहे. राज्यात जून, जुलैमध्ये कमी पाऊस, तर ऑगस्ट महिन्यात साधारण पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Monsoon lingering in andaman will hit kerala today rains will arrive in maharashtra on june 10 rgc 76 ssb