More than 100 villagers fell ill after drinking contaminated water in yavatmal | Loksatta

दूषित पाणी प्यायल्याने गावकऱ्यांना अतिसाराची लागण; १०० पेक्षा अधिक बाधित

गावात नळ योजना येऊनही ती अद्याप कार्यान्वित झाली नसल्यामुळे गावकऱ्यांवर विहिरीतल दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.

दूषित पाणी प्यायल्याने गावकऱ्यांना अतिसाराची लागण; १०० पेक्षा अधिक बाधित
दूषित पाणी प्यायल्याने गावकऱ्यांना अतिसाराची लागण

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील देवधरी गावात विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे १०० पेक्षा अधिक ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली. आज, मंगळवारी सकाळी उजेडात आलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली असून, बाधित नागरिकांना पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा- गडचिरोली : सूरजागड लोहखाणीतील ट्रक चालकाचा आदिवासी महिलेवर बलात्कार; आरोपीस अटक

ग्राम पंचायतीचा गावात ‘फिल्टर प्लांट’ आहे, मात्र तो बंद असल्याने गावकऱ्यांना विहिरीतील पाणी प्यावे लागते. २००० साली गावात नळ योजनाही कार्यान्वित झाली, परंतु ही योजनाही आजपर्यंत प्रत्यक्षात अंमलात आली नाही. त्यामुळेच विहिरीतील दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सध्या गावात मानव मिशन अंतर्गत नवीन नळ योजनेचे काम सुरू आहे. दरम्यान, अतिसाराची लागण झाल्याची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी व चमू गावात दाखल झाली असून, विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भंडाऱ्यातील दसरा उत्सवाचा एकाच पक्षाच्या दोन गटातील वादही न्यायालयात; रेल्वेला परवानगी नाकारण्याबाबत पुनर्विचार करण्याची सूचना

संबंधित बातम्या

कारागृहांत क्षमतेपेक्षा ३० टक्के जास्त कैदी ; न्यायालयीन दिरंगाईही कारणीभूत
जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली ‘पल्याड’ची दखल; मराठी चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार
वन कर्मचाऱ्यांना देखील मिळणार पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ : सुधीर मुनगंटीवार
यवतमाळ: माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची भाजपातून दोन वर्षांपूर्वीच हकालपट्टी; भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांची माहिती
११४ गोवारी बांधवांचे हौतात्म्य, २८ वर्षांचा संघर्ष, तरीही उपेक्षाच!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अंदमानच्या बेटांना ‘परमवीर चक्र’ विजेत्यांची नावे
प्रवीण दरेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा ; मुंबै बँक कथित घोटाळय़ातून नाव वगळले  
ठराविक उद्योजकांना खूश करण्यासाठी प्लास्टिकवरील निर्बंध शिथिलच पर्यावरणप्रेमींचा आरोप
‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती; निती आयोगाच्या धर्तीवरील संस्थेत ठाण्याचे विकासक अजय आशर
डिसेंबर सर्वाधिक थंडीचा महिना; राज्यभर किमान तापमान सरासरीखाली