महेश बोकडे

नागपूर : देशातील पुरातत्त्व स्थळांपैकी आजही सर्वाधिक पर्यटकांची पहिली पसंती आग्रा येथील ‘ताजमहाल’च आहे. विशेष म्हणजे, भारतातील सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेल्या पहिल्या दहा स्थळांत महाराष्ट्रातील एकही स्थळ नाही. भारत सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या स्मारक शाखेने माहितीच्या अधिकारात ही माहिती दिली आहे.

Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ

 भोपाळ येथील सामाजिक कार्यकर्ते आशीष कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून २०२०-२१ या आर्थिक वर्षांत देशातील सर्वाधिक पर्यटकांनी भेटी दिलेल्या स्थळांची माहिती पुढे आणली. त्यात आग्रा येथील ताजमहालला २०२०-२१ या आर्थिक वर्षांत १२ लाख ६८ हजार ९२६ पर्यटकांनी भेट दिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई येथील स्मारकांचा समूह ममल्लापुरम आहे. येथे ८ लाख ३७ हजार २९० पर्यटकांनी भेट दिली. तिसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वरच्या सूर्य मंदिर (कोणार्क)चा समावेश आहे. येथे ५ लाख ३१ हजार १२८ पर्यटकांनी भेट दिली. चौथ्या क्रमांकावर हैदराबाद येथील गोलकोंडा किल्ला आहे. येथे ५ लाख २८ हजार ८ पर्यटकांनी भेट दिली. पाचव्या क्रमांकावर दिल्ली येथील कुतुबमिनार असून येथे ४ लाख ७८ हजार ९१२ पर्यटकांनी भेट दिली. सहाव्या क्रमांकावर गोवा येथील अगुआडा किल्ला आहे. येथे ३ लाख ८० हजार ६६ पर्यटकांनी भेट दिली. सातव्या क्रमांकावर आग्रा किल्ल्याचा समावेश असून येथे ३ लाख ७४ हजार ५२ पर्यटकांनी भेट दिली. आठव्या क्रमांकावर रायगंजच्या हजारद्वारी पॅलेसचा समावेश आहे. येथे ३ लाख ६२ हजार १९५ पर्यटकांनी भेट दिली. नवव्या क्रमांकावर धारवाडच्या गोल- गुंबाज (विजयपुरा)चा समावेश आहे. येथे ३ लाख ५५ हजार २८२ पर्यटकांनी भेट दिली. दहाव्या क्रमांकावर हम्पी येथील स्मारकांचा समूह आहे. येथे ३ लाख ४७ हजार ३३० पर्यटकांनी भेट दिली.

जमा झालेला महसूल (२०२०- २०२१)

स्थळ महसूल (रुपयांत)

    आग्रा, ताजमहल ९,५३,४१,०७५

    चेन्नई, स्मारकांचा समूह ममल्लापुरम    ६,५१,२६,७७५

    भुवनेश्वर, सूर्य मंदिर (कोणार्क) २,०२,८१,३७०

    हैदराबाद, गोलकोंडा   १,७७,३३,५१०

    दिल्ली, कुतुबमिनार   १,५६,०१,६८०

    आग्रा, लाल किल्ला   १,३०,५८,०७०

    रायगंज, हजारद्वारी पॅलेस ७१,०१,२८०

    धारवाड, गोल- गुंबाज, विजयपुरा   ६५,०४,९५५

    हम्पी येथील स्मारकांचा समूह १,०६,२६,७३५