scorecardresearch

नागपूर: दुचाकी वळवताना दुर्लक्ष झाले अन् क्षणार्धात दोन सख्या भावांचा चेंदामेंदा

वानाडोंगरी परिसरात -हिंगणा मार्गावर मोटरसायकल वळवितांना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन सख्या तरुण भावंडांचा जागीच मृत्यू झाला.

नागपूर: दुचाकी वळवताना दुर्लक्ष झाले अन् क्षणार्धात दोन सख्या भावांचा चेंदामेंदा
वानाडोंगरी परिसरात -हिंगणा मार्गावर मोटरसायकल अपघात

वानाडोंगरी परिसरात -हिंगणा मार्गावर मोटरसायकल वळवितांना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन सख्या तरुण भावंडांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी घसकाळी ८:३० च्या सुमारास ही घटना घडली.मोहम्मद आफताब मो इस्लाम( वय२१) त्याचा लहान भाऊ मोहम्मद मुस्तफा मो इस्लाम (वय १८) अशी मृत तरूणांची नावे असून ते वानाडोंगरी येथील कान्हा आटोमोबाईलमध्ये मोटरसायकल दुरुस्ती चे काम करायचे.

हेही वाचा >>> नागपूर: तरुणीचा मृतदेह आढळला,अनैतिक संबंधातून खून ?

सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरून मोटरसायकलने ( क्र एम एच ४०डी६९१०) निघाले.वाटेत हिंगणा मार्गावर वळण घेत असतानाच हिंगणा कडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या टिप्परने ( क्र एम एच३४ एम८८११ ) मोटरसायकलला जोरदार धडक दिली यात हे दोघेही भावंड टिप्परच्या चाकात सापडले. अंगावरून टिप्पर गेल्याने त्यांचा घटनास्थळी च मृत्यू झाला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 17:55 IST

संबंधित बातम्या