लोकसत्ता टीम

नागपूर: सात दशकांपूर्वी २९ मे रोजी भारतातील माऊंट एव्हरेस्ट शिखर पहिल्यांदा सर करण्यात आले. शेर्पा तेन्सिंग नोर्गे व सर एडमंड हिलरी यांनी पहिल्यांदा जगातील सर्वोच्च शिखर सर केले होते. ही सप्तदशकपूर्ती साजरी करण्यासाठी उपराजधानीतील दोन तरुण गिर्यारोहक यश शर्मा व दक्ष खंते यांनी १३ हजार ८०० फूट उंचीचे ‘पठालसू’ शिखर सर केले.

Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…
The number of leopards in India has now reached 13 thousand 874
बाबो, भारतात बिबट्यांची संख्या आता १३ हजार ८७४….
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध

सोलांग व्हॅलीपासून आठ किलोमीटर अंतरावर आणि मनालीपासून २० किलोमीटर अंतरावर असलेले पठालसू शिखर हे हिमाचल प्रदेशच्या कुल्लू व्हॅलीमध्ये वसलेल्या उंच शिखरांपैकी एक आहे. हे शिखर चढताना दाट पाइन वृक्षांचे जंगल, गवताळ कुरणे, बर्फाच्छादित भूप्रदेश आणि लँडस्केपसारखा वाटणारा पण धोक्याचा मार्ग चढावा लागतो.

हेही वाचा… गोंदिया : पटेल, पटोलेंच्या कार्यक्षेत्रात भाजपाची बाजी; गोरेगाव बाजार समितीवर सभापती, उपसभापतींची निवड

लवचिकता आणि कौशल्य याची खऱ्या अर्थाने यात कसोटी लागते. नागपुरातील या तरुणांच्या कामगिरीमुळे शहरातील साहसी खेळांच्या वाढत्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. ‘अल्पाईन’ पद्धत म्हणजेच कोणतीही बाह्य मदत न घेता यश शर्मा आणि दक्ष खंते यांनी हे शिखर सर केले. त्यातही दिवसभरातील चढऊताराचा सामना करत शेवटपर्यंत चिकाटी दाखवली.

हेही वाचा… शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी बैलगाडी आंदोलन; मातृतीर्थात बळीराजाचा एल्गार!

यश शर्मा हे एक निपूण एन्डयुरन्स प्रशिक्षक आणि प्रसिद्ध सायकलपटू असून त्यांनी यापूर्वी एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला आहे. दक्ष खंते हा सोमलवार निकालस हायस्कूलचा इयत्ता बारावीचा विद्यार्थी असून ‘टायगर मॅन ट्रायथ्लॉन’चा विजेता देखील आहे. त्यानेही नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केले आहे. यश शर्मा आणि दक्ष खंते यांच्या या कामगिरीबद्दल गिर्यारोहक समुदायाने त्यांचे अभिनंदन केले आहे. सीएसी ऑलराउंडर अ‍ॅडव्हेंचर क्लबचे ज्येष्ठ गिर्यारोहक अजय गायकवाड आणि एव्हरेस्टर प्रणव बांडेबुचे यांचे या मोहिमेदरम्यान सहकार्य लाभले. त्यांचेही आभार गिर्यारोहकांनी मानले आहेत.