‘बाहुबली’मुळे स्त्री प्रतिमेचा कचरा | Loksatta

‘बाहुबली’मुळे स्त्री प्रतिमेचा कचरा

दहा वर्षांत एकापेक्षा एक चांगले चित्रपट येत गेल्याने मराठी सृष्टीकडे लक्ष वेधले गेले.

‘बाहुबली’मुळे स्त्री प्रतिमेचा कचरा
कासव’चे दिग्दर्शक सुनील सुखटणकर

सुनील सुखटणकर यांचे मत

गेल्यावर्षी ‘बाहुबली’ला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असले तरी तो उत्तम चित्रपट होता, असे म्हणणार नाही. या चित्रपटाने मोठी कमाई केली असली तरी एक ‘माचो’ प्रतिमा आणि महिलांनी वेढला गेलेला बाहुबली असे दाखवण्यात आले. त्यातून महिलांच्या प्रतिमेचा कचरा करण्यात आल्याचे परखड मत ‘कासव’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील सुखटणकर यांनी व्यक्त केले. ‘सिने-मोन्टेज’ या संस्थेने आयोजित केलेला हा कार्यक्रम एलएडी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यातोला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्यामला नायर, संस्थेचे अध्यक्ष राम तायडे, प्रांतिक देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

गंभीर, चांगल्या धाटणीचे, आशयघन चित्रपट निर्मिती होत नाही, असे मराठी सिनेमाविषयी बाहेर वाटायचे. मराठी चित्रपटांची परदेशातील प्रतिमा ‘सॅलो’ आहे. मात्र, श्यामच्या आईला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनेक वर्षांमध्ये चांगल्या दर्जाचे चित्रपट होत नव्हते. मात्र दहा वर्षांत एकापेक्षा एक चांगले चित्रपट येत गेल्याने मराठी सृष्टीकडे लक्ष वेधले गेले.  त्यानंतर ‘श्वास’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चांगल्या चित्रपटांची जोपर्यंत निर्मिती होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय पातळीवरील ‘ज्युरीं’चीही मानसिकता तयार होत नाही, अशी सिनेसृष्टीतील विविधांगी माहिती सुखटणकर यांनी उपस्थितांना दिली. व्यावसायिक चित्रपट आणि गुणवत्ता ही एकत्र नांदतेच असे नाही. मात्र व्यावसायिक चित्रपट चांगले नसतात, असेही नाही. कारण ‘दिल चाहता है’ सारख्या चित्रपटाचा एक वेगळा प्रयोग खरोखर भावला. प्रादेशिक सिनेमे मुख्य प्रवाहातील सिनेमांची श्रीमंती नक्कीच वाढवतात. अलीकडे तयार झालेला ‘दंगल’ चित्रपट हे त्याचेच उदाहरण म्हणता येईल. ‘मातीतली कुस्ती’ या लघुचित्रपटाचा दिग्दर्शक, लेखक प्रांतिक देशमुख यानेही मनोगत व्यक्त केले आणि काही आठवणींना उजाळा दिला. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनीही मराठीतून भाषण करीत मराठी चित्रपटांच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. चित्रपट दृष्टीकोण आणि सामाजिक मानसिकता बदलन्याचे एक महत्त्वपूर्ण माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन ऋता धर्माधिकारी यांनी केले.

सुखटणकर यांनी निर्मिलेले आणि दिग्दर्शित केलेले ६० ते ७० टक्के चित्रपट सामाजिक विषयांना घेऊन तयार करण्यात आले आहेत. मानसिक आजारासंबंधी किंवा सामाजिक अन्यायाला वाचा फोडणारे चित्रपट त्यांनी केले आहेत. ‘नैराश्येतून’ बाहेर येण्यास धडपणाऱ्या एक तरुण आणि त्याला मदत करणारी एक महिला अशी ‘कासव’ या चित्रपटाची संकल्पना आहे. त्याला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-04-2017 at 03:19 IST
Next Story
बंटी शेळकेंच्या पाठीशी चतुर्वेदी, राऊत