चंद्रपूर : तर शिवरायांचे मावळे राज्यपालांना सळो की पळो करून सोडतील! ; खासदार बाळू धानोरकर यांचा सज्जड इशारा | MP Balu Dhanorkar stern warning to Governor Bhagat Singh Koshyari over his statement amy 95 | Loksatta

चंद्रपूर : तर शिवरायांचे मावळे राज्यपालांना सळो की पळो करून सोडतील! ; खासदार बाळू धानोरकर यांचा सज्जड इशारा

माज आल्यासारखे काम करू नका

चंद्रपूर : तर शिवरायांचे मावळे राज्यपालांना सळो की पळो करून सोडतील! ; खासदार बाळू धानोरकर यांचा सज्जड इशारा
( खासदार बाळू धानोरकर )

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे, मराठी माणसांचे राज्य आहे. ज्या दिवशी शिवाजी महाराजांचे मावळे रस्त्यावर उतरतील त्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सळो की पळो करून सोडतील, असा इशारा काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी दिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईत महाराष्ट्रातून गुजराती व राजस्थानी चालले गेले तर महाराष्ट्रात काहीही उरणार नाही असे वक्तव्य केले. राज्यपालांच्या या वक्तव्यावरून आता चांगलाच गदारोळ माजला आहे. सर्व ठिकाणाहून राज्यपाल यांच्यावर टीका होत असतानाच काँग्रेस खासदार धानोरकर यांनीही कडक शब्दात इशारा दिला आहे. तुम्ही राज्यपाल आहात याचा अर्थ तुम्ही काहीही बोलले पाहिजे, असे नाही. तुमचे पद काय याचा विचार करूनच वक्तव्य केली पाहिजे.

उत्तराखंडमध्ये यांना कोणी विचारत नाही, मुख्यमंत्री म्हणून निवृत्त झालेले हे लोक आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्रात राज्यपाल बनविले हे आणि हे आम्हाला शिकवतात का? गरज नाही या महाराष्ट्राला अशा लोकांची. राज्यात जे उद्योगपती तयार झाले ते महाराष्ट्राने, मराठी माणसाने तयार केले. असे माज आल्यासारखे राज्यपालांनी काम करण्याची अजिबात गरज नाही, असेही धानोरकर म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-07-2022 at 12:58 IST
Next Story
नागपूर : देयक भरणाऱ्यांना महागडी वीज, चोरी करणारे फायद्यात! ; नितीन गडकरी यांनी महावितरणचे कान टोचले