वर्धा : MPSC म्हणजेच म्हणजेच महाराष्ट्र लोकसवा आयोग. राज्याच्या प्रशासनात विविध श्रेणीतील पदे रिक्त होतात किंवा काही जागा नव्याने भरल्या जात असतात. ही पदे भरण्यासाठी शासनाने या लोकसेवा आयोगावर जबाबदारी टाकली आहे.

लेखी, मुलाखत स्वरूपात उमेदवार निवडल्या जात असतात. पण या परीक्षेच्या तयारीस कठोर परिश्रम ईच्छुक घेतात पण सगळेच यशस्वी होतात असे नाही. त्याची विविध कारणे दिल्या जातात. तयारी करण्यासाठी जी आर्थिक ताकद लागते, ती अनेकांजवळ नसते. म्हणून ही मदत पुढे आली आहे.

‘ अमृत ‘ देणार मदत

MPSC परीक्षेच्या तयारीसाठी ईच्छुक उमेदवार तयारी करतातंच. पण विशेष मार्गदर्शन आवश्यक ठरते. ते देण्यासाठी एक संस्था पुढे आली आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत ही संस्था मदतीस पुढे आली आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकतील लक्षित गटाच्या उमेदवारांनाच लाभ मिळणार. या गटातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) च्या गट – ब ( अराजपत्रित ) सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्व तयारीसाठी ही प्रोत्साहनपर अर्थ सहाय्य योजना २०२५ – २६ सत्रात राबविण्यात येत आहे.

अशी मिळणार मदत

या योजनेत काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. परीक्षेस पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी १० हजार रुपये तर मुलाखत तयारीसाठी ५ हजार रुपये अर्थसाहाय्य ही संस्था देणार. मदत व अन्य बाबत सर्व माहिती ही अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २७ एप्रिल २०२६ ही आहे.

सूचना पालन करावे

सन २९२५ – २६ मधील गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण उमेदवा्रांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ईच्छुक उमेदवार यांनी http://www.mahaamrut. org. In या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क करता येईल, असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

MPSC परीक्षा उत्तीर्ण म्हणजे शासकीय नोकरीची हमी. शासन सेवेत जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण काही त्यासाठी पुस्तके, विशेष मार्गदर्शन व अन्य बाबतीत लागणाऱ्या तयारीत कमी पडतात. आर्थिक पाठबळ असल्यास ते पण बाजी मारू शकतात. अशा गुणवंत उमेदवारास अशी मदत मोलाची ठरते. ते हेरून खुल्या गटातील उमेदवारांना ही मदत म्हणजेच आर्थिक सहाय्य देणारी ही योजना आहे.