नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आयोगाने चार दिवसांमध्ये अनेक परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. तर अनेक परीक्षांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आणि तात्पुरती गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्या परीक्षांचे निकाल आणि मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर झाला हे आता तुम्हाला एका क्लिकवर माहिती होणार आहे. एमएपीएससीमधील सर्व प्रकारच्या ताज्या घडामोडींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

एका दिवसात उत्तरतालिका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३१ मे, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२६’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या एका दिवसानंतरच उत्तर तालिका जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यावरून आता हरपाळकर पॅटर्नची चर्चा सुरू झालेली आहे.

या आहेत ताज्या घडामोडी….

  • जा. क्र. ०९३/२०२५ प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – मुलाखत कार्यक्रम
  • जाहिरात क्रमांक ००१/२०२५ शरीरविकृती शास्त्रज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ – तात्पुरती गुणवत्ता यादी – प्रसिद्धीपत्रक
  • जाहिरात क्रमांक ००३/२०२५ अस्थिव्यंगोपचारशास्त्र तज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ – मुलाखत कार्यक्रम
  • जाहिरात क्रमांक ०८८/२०२४ प्राध्यापक अणुविद्युत व दूरसंचरण अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गट-अ – मुलाखत कार्यक्रम
  • जाहिरात क्रमांक ०२८/२०२५ सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – मुलाखत कार्यक्रम
  • जाहिरात क्रमांक १००/२०२५ प्राध्यापक, नवजातशिशूशास्त्र , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ – मुलाखत कार्यक्रम
  • जाहिरात क्रमांक ०४६/२०२५ सहयोगी प्राध्यापक, उर:शल्यचिकित्साशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ- मुलाखत कार्यक्रम
  • जाहिरात क्रमांक ११३/२०२५ उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लहान मुद्रणालये)/अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ – मुलाखत कार्यक्रम
  • जाहिरात क्रमांक ००४/२०२५ बधिरीकरण तज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ- मुलाखत कार्यक्रम
  • जाहिरात क्रमांक १०९/२०२५ प्राध्यापक, मुखऔषधशास्त्र, रोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभाग नायर रूग्णालय दंत महाविद्यालय, गट-अ – मुलाखत कार्यक्रम
  • जा. क्र. ०९३/२०२५ प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – मुलाखत कार्यक्रम
  • जा. क्र. ०२९/२०२५ सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ- मुलाखत कार्यक्रम