वर्धा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२० मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल अखेर जाहीर केला आहे. आर्थिक दुर्बल घटक वगळून इतर ५८५ विद्यार्थ्यांचा निकाल पुढे आला आहे.

आत्मदहन करायचे का, असा सवाल उमेदवारांनी केला होता. त्याचीच आज दखल घेण्यात झाली, असे समता परिषदेचे नेते प्रा. दिवाकर गमे यांनी स्पष्ट केले. मंत्रालय व लोकसेवा आयोग स्तरावर काहीच हालचाल न झाल्याने तीन वर्षापासून प्रश्न प्रलंबित राहीला. तेव्हा ही बाब प्रा. गमे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ही बाब उपस्थित केली. त्यांनी सूचना केल्यावर सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी लोकसेवा आयोगास शासनाचा अहवाल तात्काळ पाठविण्याची विनंती केली.यानंतर वेगाने चक्रे फिरली.

हेही वाचा >>>“एक शरद पवार म्हणजे शंभर अजित पवार तयार करणारी फॅक्ट्री”, प्रदेश सरचिटणीसांसह शंभर पदाधिकाऱ्यांचा ताफा मुंबईकडे

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निकाल जाहीर करून नियुक्ती द्यावी, असा सकारात्मक अहवाल पाठविण्यात आला.त्यामुळे आज एमपीएससीने आज हा निकाल जाहीर केला असल्याचे प्रा. गमे यांनी सांगितले. त्याचा जाहीर आनंद विद्यार्थ्यांनी प्रकट केला.काही विद्यार्थ्यांनी सचिव सुमंत भांगे तसेच प्रा. गमे यांची आज मंत्रालयात भेट घेत आनंद व्यक्त केला. मंत्री भुजबळ यांचेही आभार मानले. आता गृह खात्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती देत प्रशिक्षणासाठी पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.