scorecardresearch

नागपूर: आता श्रीमंत मुधोजी राजे भोसलेही मैदानात, लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी

मंगलप्रभात लोढा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले.

नागपूर: आता श्रीमंत मुधोजी राजे भोसलेही मैदानात, लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

नागपूर: मंगलप्रभात लोढा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. खासदार छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती उदयन राजे यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता श्रीमंत राजे भोसले यांनीही लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हेही वाचा >>> ‘हॅलो… मी नितीन गडकरी बोलतोय!’

या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे आपण तात्काळ लोढा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ही मागणी महाराजांचा वंशज या नात्याने देशातील तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने करत असल्याचे राजे भोसले म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 11:56 IST

संबंधित बातम्या