नागपूर : राज्यातील अतिवृष्टीमुळे ६ ते ९ जुलै २०२६ या कालावधीत रद्द करण्यात आलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस) लेखी परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करत सर्व संबंधित महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना नवीन तारखांनुसार परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील हजारो विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे ? हे विशेष.

एमयूएचएसने हा निर्णय का घेतला?

एमयूएचएसच्या उन्हाळी-२०२६ टप्पा-२ परीक्षेदरम्यान राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ६, ७, ८ आणि ९ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. आता या परीक्षांसाठी सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

कोणत्या परीक्षांवर या निर्णयाचा परिणाम झाला आहे?

उन्हाळी-२०२६ टप्पा-२ अंतर्गत राज्यभरातील विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांपैकी ६ ते ९ जुलैदरम्यान नियोजित असलेल्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या सर्व परीक्षांचे आता पुनर्नियोजन करण्यात आले आहे.

नवीन परीक्षा वेळापत्रक काय आहे?

विद्यापीठाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार,
६ जुलै २०२६ रोजीची परीक्षा आता २३ जुलै २०२६ (गुरुवार) रोजी होईल.
७ जुलै २०२६ रोजीची परीक्षा आता २४ जुलै २०२६ (शुक्रवार) रोजी होईल.
८ जुलै २०२६ रोजीची परीक्षा आता २७ जुलै २०२६ (सोमवार) रोजी होईल.
९ जुलै २०२६ रोजीची परीक्षा आता २९ जुलै २०२६ (बुधवार) रोजी होईल.

इतर परीक्षांमध्ये काही बदल आहे का?

नाही. विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की १० जुलै २०२६पासून पुढील सर्व लेखी परीक्षा पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच घेतल्या जातील. त्यामुळे ज्या परीक्षांवर स्थगिती लागू झाली नव्हती, त्या नियोजित वेळापत्रकानुसारच होतील.

महाविद्यालयांना कोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत?

विद्यापीठाने सर्व अधिष्ठाता, प्राचार्य, केंद्रप्रमुख आणि परीक्षा केंद्रांना सुधारित परीक्षा वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच महाविद्यालयांच्या सूचना फलकावर तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमांतून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे.

विद्यार्थ्यांनी आता काय करावे?

विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून सुधारित वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी. परीक्षा केंद्र, वेळ आणि इतर सूचना पूर्ववत राहणार असल्याने नवीन तारखांनुसार तयारी करून नियोजित दिवशी परीक्षेला उपस्थित राहावे, असे विद्यापीठाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून सुधारित वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी. परीक्षा केंद्र, वेळ आणि इतर सूचना पूर्ववत राहणार असल्याने नवीन तारखांनुसार तयारी करून नियोजित दिवशी परीक्षेला उपस्थित राहावे, असे विद्यापीठाने म्हटले आहे.