लोकसत्ता टीम

अकोला: शहरातील दंगल प्रकरणाची मुंबई एसटीएसकडून गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्या अहवालावरून दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
Assembly Speaker Rahul Narvekars letter to Chief Minister to Change the name of Alibaug
अलिबागचे नाव बदला, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Supriya Sule on Delhi Chief Minister Arvind Kejriwal arrested by ED Marathi News
“पापी पेट का सवाल…”, केंद्रीय यंत्रणांची बाजू घेत सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींवर टीका
election commission arrest cm
केजरीवाल, लालू ते जयललिता; आतापर्यंत ‘या’ ५ मुख्यमंत्र्यांना ईडीकडून अटक

अकोला अत्यंत संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. समाजमाध्यमावरील एका आक्षेपार्ह पोस्टचे कारण झाले अन् शहरात १३ मे रोजी दंगल उसळली होती. जुने शहरातील हरीहरपेठ, राजराजेश्वर मंदिर, पोळा चौक भागात समाजकंटकांनी हैदोस घातला. जाळपोळ, तोडफोड व दगडफेक करण्यात आली. धार्मिक स्थळांना देखील क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न असामाजिक तत्त्वांकडून करण्यात आला. या दंगलीमध्ये एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला असून आठ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

हेही वाचा… भंडारा डेपोमधून १० हजार १६५ ब्रास वाळू विक्री; ऑनलाईन विक्रीला प्रतिसाद

मुंबईच्या एटीएस पथकाने अकोल्यात तीन दिवस मुक्काम ठोकून गोपनीय पद्धतीने सखोल चौकशी केली. घटनेचा संपूर्ण तपशील जाणून घेत त्यामागील कारणांचा शोध घेतला. या घटनेमागे कोणाचा हात होता का? याचा शोध पथकाद्वारे घेण्यात आल्याची माहिती आहे. येत्या तीन-चार दिवसांत याबाबतचा अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती आहे. स्थानिक पोलीस यंत्रणेने एटीएसद्वारे चौकशी झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.