विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचेही लक्ष

नागपूर : आगामी महापालिके च्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनिश्चितता आहे. ऐन वेळेवर शासन याबाबत निर्णय घेऊ शकते, असे राजकीय पक्षांचे मत आहे. दरम्यान, शहराचा विस्तार वाढल्याने सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट के ल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते, असे झाल्यास नव्याने वॉर्ड किं वा प्रभाग रचना के ली जाऊ शकते, असाही मतप्रवाह आहे.

विद्यमान महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ फेब्रुवारीपर्यंत असल्याने त्यानंतर निवडणुका अपेक्षित आहे. सध्या प्रभाग रचना अस्तिवात आहे. तीन वॉर्डाचा एक प्रभाग आहे.  ही पद्धत बदलवून वॉर्ड रचनेनुसार निवडणुका घ्याव्या, असा प्रयत्न महाविकास आघाडीचा आहे. पण त्यावर अद्याप एकमत झालेले नाही.

वॉर्डप्रमाणे निवडणुका झाल्यास आरक्षणाचा फटका काही नगरसेवकांना बसू शकतो, त्यामुळे एकल वॉर्डऐवजी दोन वॉर्डचा एक प्रभाग करावा, असे काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. प्रभाग पद्धतीचा फायदा भाजपला होतो हे यापूर्वी झालेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे ही पद्धत कायम राहण्याची शक्यता कमी आहे, पण नव्या पद्धतीबाबत अद्याप अस्पष्टता असल्याने नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सध्या महापालिकेत १५१ सदस्य आहेत. हुडकेश्वर नरसाळा, रनाळासह इतर काही शहराला लागून असलेला पण ग्रामीणमध्ये   समाविष्ट असलेला भाग महापालिका हद्दीत जोडला जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर सदस्यसंख्या वाढेल. त्यामुळे वार्ड रचनेतही बदल करावा लागेल. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे.

नगरसेवकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. करोनामुळे त्याला मर्यादा आल्या असल्या तरी नवी रचना आणि आरक्षण याची चिंता नगरसेवकांना व इच्छुकांनाही आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटला नाही. तो दीर्घकाळ असाच राहिला  व ओबसी आरक्षणाशिवायच निवडणुका झाल्यातर खुल्या जागांची संख्या वाढेल.

त्याचेही परिणाम निवडणुकीवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने तयारी सुरू के ली आहे. तिजोरीतील खडखडाट आणि अवास्तव घोषणा व त्यांची पूर्तता करण्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे भाजप चिंतित आहे. मात्र पक्षाने संघटनात्मक बांधणीवर भर देऊन त्या आधारावर निवडणुकांना पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू के ला आहे.

दुसरीकडे भाजपच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात शहर विकास झाला नसल्याचा मुद्दा  विरोधकांच्या हाती आहे. या रणनीतीत वॉर्ड किं वा प्रभागरचना कशी असेल याला महत्त्व असल्याने सर्वांचे लक्ष याकडे  लागले  आहे.