आंतरजातीय विवाहावर टिपणी केल्याने खून

ही घटना  नरखेड पोलीस ठाण्यांतर्गत गोंडेगाव शिवारात १८ जुलैच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : मुलीने दुसऱ्या धर्माच्या तरुणाशी विवाह केल्यानंतर दारू प्राशन करून मद्यधुंद अवस्थेत टिपणी करणाऱ्याचा चौघांनी मिळून खून केला.

ही घटना  नरखेड पोलीस ठाण्यांतर्गत गोंडेगाव शिवारात १८ जुलैच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. रोशन शेषराव बानाईत ( ३२), रा. बेलोना, नरखेड असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली. विलास जंगलूजी कवडती (४५), शुभम विलास कवडती (२४), नितेश बाळकृष्ण कवडती (२८) आणि रोहित रत्नाकर कवडती (२१) सर्व रा. गोंडेगाव, नरखेड अशी आरोपींची नावे आहेत.

मृत रोशन हा  मित्र माधव गणपतराव अलोणे (३०) आणि होमेश युगलसिंग बनाफर (२८) दोन्ही रा. बेलोना, नरखेड यांच्यासोबत गोंडेगाव शिवाराज दारू पित बसला होता. त्यावेळी रोशनने विलासला उद्देशून त्याच्या मुलीने दुसऱ्या धर्मातील मुलाशी पळून जाऊन लग्न केल्याची टिपणी केली. यातून त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपींनी काठी व दगडाने ठेचून रोशनचा खून केला. माधव हा जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Murder due to comment on interracial marriage zws