नागपूर : गरीबीत जीवन जगणाऱ्या दाम्पत्याने मुलाच्या आयुष्याला हातभार लागावा म्हणून एका शेतात मजूर म्हणून काम स्वीकारले. त्याच शेतात  अन्य मजूरसुद्धा कामाला होते. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. एकाने दुसऱ्याचा पाण्यात बुडवून खून केला आणि शेतातील घरात मृतदेह लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी बापासाठी शिदोरी आणणाऱ्या मुलाने घराचा दरवाजा उघडताच बापाचा मृतदेहच मुलाला दिसला. हातातील शिदोरी फेकून त्याने वडिलाच्या मृतदेहाला कवटाळून टाहो फोडला

हिंगणा पोलिसांनी आरोपी शेतमजुराविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. रमेश संतोष घोटेकर (६५) रा. खैरी पन्नासे ता. हिंगणा जि. नागपूर असे मृतकाचे तर प्रकाश नामदेव कावळे (४५) रा. दिग्रस ता. काटोल जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे़ 

Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
Hit and run Nagpur, political leader car Nagpur,
नागपुरात राजकीय नेत्याच्या कारचे ‘हिट अ‍ॅण्ड रन’, पाच वाहनांना धडक
MPSC Maharashtra  State Services Exam Date Update Nagpur
MPSC Update: ‘एमपीएससी’ राज्यसेवा परीक्षेच्या तारखेसंदर्भात मोठी अपडेट, बैठकीमध्ये निर्णय होताच…
Ganesh utsav, price gold, gold, gold price news,
गणेशोत्सवाच्या तिसऱ्याच दिवशी सोन्याचे दर… चिंता वाढली !
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
Mahavitaran arrears, Abhay Yojana,
महावितरणला थकबाकीचा ‘झटका’
beggars Nagpur, beggars luxury bus,
नागपुरात भिकारी गोळा केले… आलिशान गाडीत बसवले आणि थेट…
Death mother daughter Gondia, snake bite Gondia,
गोंदिया : सर्पदंशाने मायलेकींचा मृत्यू
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा

हेही वाचा >>> ‘करिअर अकॅडमी’ने विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडविले; विदर्भासह मराठवाड्यातील पालकांना फटका…

काय घडले

रमेश हा गणेश धानोरकर यांच्या शेतात तीन वर्षांपासून मजुरी करीत होता आणि शेतातच राहत होता. गावात त्याची पत्नी व मुलगा मंगेश राहतात. तर मागील काही महिन्यांपूर्वी आरोपी प्रकाश सुद्धा याच शेतात मजूर म्हणून काम करायला आला आणि तिथेच राहू लागला. या दोघांनाही मद्याचे व्यसन होते. सोबत मद्य प्यायचे मात्र मद्य पिल्यावर त्यांचे एकमेकांशी भांडण होते होते.

बुधवारी दुपारी दोघेही सोबतच गावाशेजारी दुसऱ्या गावात यात्रेला गेले होते. सायंकाळी दोघेही मद्य पिऊन शेतात परतले. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यात आरोपीने रमेशला मारहाण करून शेतातील पाण्याच्या टाक्यात ढकलले व मद्याच्या नशेत स्वतः तिथेच झोपला. गुरुवारी पहाटे आरोपीची झिंग उतरल्यावर त्याला रमेश टाक्यात बुडून मरण पावला असल्याचे लक्षात आले. तेव्हा आरोपीने त्याला टाक्याच्या बाहेर काढले व मृतदेह एका खोलीत नेऊन त्या खोलीला कुलूप लावले आणि स्वतःचे सामान पिशवीत भरून तिथून पळून जाण्यासाठी निघाला.

हेही वाचा >>> बदलापूरनंतर बल्लारपूर, बलात्काराच्या दोन घटनांनी शहर हादरले

असे आले हत्याकांड उघडकीस

सकाळी रमेश घोटेकर यांचा मुलगा मंगेश हा वडिलांसाठी जेवन घेऊन शेताकडे येत होता. त्याला आरोपी त्याला दिसला. त्याने वडील कुठे आहे? अशी विचारणा केली. तर आरोपीने शेतात आहेत, असे उत्तर देऊ तिथून पुढे निघून गेला. मंगेश शेतात पोहचला तेव्हा त्याला त्याचे वडील दिसले नाही. शोधाशोध केल्यानंतर तिथे पडलेल्या किल्ल्या उचलून त्याने खोलीचे दार उघडून बघितले तर त्याचे वडील मृत अवस्थेत पडून असलेले दिसले. मंगेश ने तात्काळ शेतमालक धानोरकर यांना माहिती दिली.

आरोपीचा शोध सुरु

हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार प्रशांत ठवरे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. तसेच फरार आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. आरोपी पळून आपल्या गावाकडे गेला असावा, यासाठी एक पथक त्या दिशेनेसुद्धा पाठविण्यात आले आहे.