नागपूर : एका २० वर्षीय तरूणीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना काटोल तालुक्यातील चारगावजवळ उघडकीस आली. अद्याप तरुणीची ओळख पटली नसून प्रेमसंबंधातून युवतीचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी चारगाव रस्त्यावरून काही वाहने जात असताना त्यांना एका २० वर्षे वयोगटातील तरूणीचा मृतदेह दिसला. एका युवकाने गाडी थांबवून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. काही वेळातच काटोल पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तरूणीचे डोके दगडाने ठेचले होते. तिला फरफटत खेचून आणल्याचेही स्पष्ट दिसत होते. पोलिसांनी तरूणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी  रवाना केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला का?, तरूणी गर्भवती होती का? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder love affair police young woman body ysh
First published on: 04-07-2022 at 15:26 IST