scorecardresearch

नागपूर: तरुणीचा मृतदेह आढळला,अनैतिक संबंधातून खून ?

कळमना परिसरातील पावनगावाजवळ २५ ते २७ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला.

नागपूर: तरुणीचा मृतदेह आढळला,अनैतिक संबंधातून खून ?
( संग्रहित छायचित्र )

कळमना परिसरातील पावनगावाजवळ २५ ते २७ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. त्या तरुणीचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले असून कळमना पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. अनैतिक संबंधातून नागपुरात पळून आल्यानंतर प्रियकरासोबत बिनसल्यामुळे प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

हेही वाचा >>>भंडारा: शाळेतून घरी आल्यावर चिमुकली खेळण्याकरिता बाहेर गेली आणि…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावनगाव ते कामठी रोडवर सोमवारी सकाळी आठ वाजता एका शेतात तरुणीचा मृतदेह आढळला. कळमना पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार विनोद पाटील हे घटनास्थळावर पोहचले. प्राथमिकदृष्ट्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे दिसत होते. तिचा गळा आवळून खून केल्याचे वैद्यकिय अहवाल प्राप्त होताच कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तरुणीच्या हातावर रजनी आणि ‘आर’ असे इंग्रजीत गोंदलेले आहे. ती तरुणी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील रहिवाशी असावी व प्रियकरासोबत नागपुरात आली असावी. प्रियकराशी वाद झाल्यानंतर गुंगीचे औषध पाजून तिचा गळा आवळ्याची चर्चा आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा आणि कळमना पोलीस तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 17:16 IST

संबंधित बातम्या