नागपूर : छत्रपती शिवरायांच्या राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बोंढारमध्ये अक्षय भालेरावची हत्या होणे हे गंभीर आहे. या राज्यात दलित, वंचित समाज सुरक्षित नाही, असा आरोप करीत माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या प्रकरणात एसआयटी मार्फत तपास करून दोषींवर कारवाईची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षय केवळ दलित आहे म्हणून आणि गावात भीम जयंती साजरी केली म्हणून ज्या पद्धतीने भोसकून त्याचा खून झाला, हे दुदैवी आहे. त्याच्या भावाला आणि आईला मारण्याचा प्रयत्न झाला ही घटना या राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले -शाहू -आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या महाराष्ट्रात आज दलित सुरक्षित का नाहीत, असा प्रश्नही डॉ. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांपुढे उपस्थित केला.

हेही वाचा >>>अमरावती : शरद पवारांना धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकरला तात्‍काळ अटक करा, राष्‍ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पोलीस आयुक्‍तांना निवेदन

ॲट्रोसिटी ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यावर बोट ठेवत त्यांनी यापूर्वी ॲट्रोसिटीच्या घटनेतील जवळपास ६३० कुटुंबातील अवलंबितांना अजूनही नोकरी मिळाली नसल्याकडेही लक्ष वेधले. अक्षय भालेराव खून प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालून पीडित कुटुंबास भेट देत त्यांना न्याय मिळवून द्यावा, कुटुंबीयांना ५० लाखांची मदत करावी, कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, या प्रकरणात सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of akshay bhalerao in bondhar of nanded district in the state of chhatrapati shivaji mnb 82 amy
First published on: 09-06-2023 at 19:39 IST