नागपूर : हरियाणातील पराभवानंतर महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक विविध समाजाचे दबाव पक्षावर वाढले आहे. काँग्रेससाठी हरियाणा अनुकूल असल्याचे सर्व सर्वेक्षणातून स्पष्ट झाले होते. परंतु, तेथील जाट समाज विरुद्ध इतर असे समीकरण घडून आले व ते भाजपच्या पथ्यावर पडले. यानंतर इच्छुक विविध समाजाच्या नेत्यांचा दबाव काँग्रेसवर वाढताना दिसून येत आहे. विशेषत: मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात मुस्लीस समाजाला उमेदवारी देण्याचा आग्रह होत आहे.

लोकसभा तसेच विधान परिषदेवर काँग्रेसने मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही. मुस्लीम समाज सर्व निवडणुकीत कायमच काँग्रेसच्या बाजूने कौल देत आला आहे. त्यामुळे या समाजाला काँग्रेस पक्ष गृहीत धरत असल्याची भावना मुस्लीम समाजाच्या नेत्यांची आहे. त्यामुळे हे नेते कधी सामाजिक संघटना, धार्मिक संघटना तर कधी राजकीय डावपेचच्या माध्यमातून काँग्रेसवर उमेदवारी देण्यासाठी दबाव निर्माण करीत असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-उद्धव ठाकरे यांची स्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी…

हलबाबहुल मध्य नागपूरमध्ये हलबा समाजाचा उमेदवार देत नसल्याने काँग्रेसला येथे पराभूत व्हावे लागत आहे. हलबा समाजाची एकगठ्ठा मते समाजाच्या उमेदवाराच्या बाजूने पडतात, असे या समाजातील काही नेते पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सांगून यावेळी उमेदवारी हलबा व्यक्तीला द्यावी असा आग्रह धरत आहे. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचा आजवरचा इतिहास बघता येथे बहुतांशवेळा हलबा व मुस्लीम उमेदवाराची सरशी झाली आहे. काँग्रेसकडून अनेकदा मुस्लीम समाजाच्या व्यक्तीने प्रतिनिधित्व केले आहे तर भाजपकडून सलग तीनवेळा हलबा समाजाच्या व्यक्तीने प्रतिनिधित्व केले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपने बाजी मारली होती. परंतु, अतिशय कमी म्हणजे चार हजार मतांनी काँग्रेस उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता. एमआयएमच्या उमेदवाराने साडेआठ हजारांहून अधिक मते घेतली होती. आता या मतदारसंघात काँग्रेसकडून ३३ इच्छुकांनी अर्ज केले आहे. पक्षाचे निरीक्षक नसीम खान यांनी त्यांची मुलाखत देखील घेतली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हलबा आणि मुस्लीम समाज यापैकी एकाची नाराजी दूर करावी लागणार आहे.

आणखी वाचा-पती कामावर जाताच पत्नी पैशासाठी ठेवायची ग्राहकांशी शारीरिक संबंध

मराठा उमेदवाराचा साडे तीन हजाराने पराभव काँग्रेसने २०१९ च्या निवडणुकीत युवक काँग्रेसचे सरचिटणीस बंटी शेळके यांना मध्य नागपूर मधून उमेदवारी दिली होती. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वडिलोपार्जित निवासस्थान असलेल्या महाल भागाचे माजी नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचे विकास कुंभारे यांना कडवी झुंज दिली. त्यांचा केवळ साडेतीन हजाराने पराभव झाला होता.मध्य नागपूर विधानसभा निवडणूक मतदारसंघात मुस्लीम किंवा हलबा समाजाला उमेदवारी देण्यावरून काँग्रेस समोर पेच आहे.

Story img Loader