scorecardresearch

“…तर नागराज मंजुळे पोलीस शिपाई असते!”, स्वत:च सांगितला ‘तो’ किस्सा

नागराज मंजुळे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक. त्यांनी आपल्या सैराट व इतर चित्रपटांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

“…तर नागराज मंजुळे पोलीस शिपाई असते!”, स्वत:च सांगितला ‘तो’ किस्सा
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अकोला : नागराज मंजुळे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक त्यांनी आपल्या सैराट व इतर चित्रपटांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. साधारणत: २८ वर्षांपूर्वी नागराज मंजुळे यांनी आपला निर्णय बदलला नसता तर ते आज दिग्दर्शक नव्हे तर पोलीस शिपाई असते. दहाव्या अखिल भारतीय गझल संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच अकोला शहरात आलेल्या नागराज मंजुळे यांनी आपल्या आयुष्यातील ‘ती’ घटना उलगडून मांडली.

गझल संमेलनात बोलताना नागराज मंजुळे यांनी आपल्या जीवनातील किस्सा सांगण्यासोबतच जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘‘संमेलनाच्या निमित्ताने अकोल्यात आज प्रथमच आलो. अकोल्यात येण्याचा योग १९९५ मध्येच आला होता. त्यावेळी पोलीस भरतीमध्ये शिपाई म्हणून माझी निवड झाली होती. पोलीस प्रशिक्षणासाठी मला अकोला केंद्र मिळाले. माझा भाऊदेखील येथे प्रशिक्षणासाठी होता.

हेही वाचा >>> फार्महाऊसमध्ये कोंडून तीन वर्षे बलात्कार; पीडित मुलगी ११ दिवसांच्या बाळासह ताब्यात

मात्र, पोलीस भरती झाल्यावर काही दिवसांतच मन वळले. आपल्याला हे काही जमणार नाही, असे लक्षात आले. म्हणून १३ दिवसांतच पोलिसाची नोकरी सोडून दिली. अन्यथा त्यावेळीच अकोल्यात येऊन नऊ-दहा महिने प्रशिक्षण घेण्याचा योग आला असता व आता पोलीस शिपाई राहिलो असतो, असे नागराज मंजुळे म्हणाले. त्यावेळी आपल्याला पोलीस शिपाई होता आले नसले तरी आता आपल्या आगामी मराठी चित्रपटात थेट पोलीस निरीक्षकाची भूमिका पार पाडत असल्याचे मंजुळेंनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 19:19 IST

संबंधित बातम्या