scorecardresearch

नागपूर : भाजप समर्थित उमेदवार नागो गाणारांची थेट देवेंद्र फडणवीसांविरोधात भूमिका

नागो गाणार यांनी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’चा नारा देणारी टोपी घालून उमेदवारी अर्ज भरतानाच फडणवीसांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले.

नागपूर : भाजप समर्थित उमेदवार नागो गाणारांची थेट देवेंद्र फडणवीसांविरोधात भूमिका
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर: जुनी पेन्शन योजना शासन देणार नाही. कारण दिल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केले. जुनी पेन्शन योजना दिल्यास राज्यावर १ लाख १० हजार कोटींचा बोजा पडेल व राज्य दिवाळखोरीत निघेल. त्यामुळे शासन जुनी पेन्शन देणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. असे असतानाही भाजप समर्थित महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार नागो गाणार यांनी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’चा नारा देणारी टोपी घालून उमेदवारी अर्ज भरतानाच फडणवीसांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>> ‘‘भाजपने शिंदे गटाला एकही जागा दिली नाही’’; नाना पटोले यांची टीका, म्हणाले “ते सत्तेत फक्त….”

नागो गाणार यांनी गुरुवारी शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गाणार आणि त्यांच्या समर्थकांनी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’चा नारा देणारी टोपी घातली होती. एकीकडे फडणवीसांनी जुनी पेन्शन देणार नाही. जुनी पेन्शन योजना दिल्यास राज्यावर १ लाख १० हजार कोटींचा बोजा पडेल व राज्य दिवाळखोरीत निघेल असा थेट इशारा दिला असता त्यांच्याच पक्षाचे समर्थित उमेदवार गाणारांनी जुन्या पेन्शचा नारा देत शिक्षक मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही होत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 16:33 IST

संबंधित बातम्या