scorecardresearch

नागपूर : भावनिक पत्र लिहून तरुणाची आत्महत्या

…अन् सहकाऱ्यांनी खोलीत डोकावले असता करण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला

नागपूर : भावनिक पत्र लिहून तरुणाची आत्महत्या
प्रतिनिधिक छायाचित्र

यवतमाळ येथील रहिवासी असलेल्या आणि नागपुरातील खासगी कंपनीत कार्यरत एका २२ वर्षीय तरुणाने, “आपण जिवंत राहिल्यास आई-वडील आणखी उद्ध्वस्त होतील.”, असे पत्र लिहून गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी संध्याकाळी बोले पेट्रोल पंपामागे ही घटना घडली.

करण शांतीलाल जयस्वाल (वय -२२, रा. माळीपुरा, नवप्रशांत चौक, यवतमाळ) सध्या मुक्काम ऋतसृष्टी संकुल, पाचवा माळा, बोले पेट्रोल पंपच्या मागे, नागपूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आणि पत्ता आहे.

करण हा नागपुरातील शाह ओव्हरसिस या खासगी कंपनीत कार्यरत होता. तो फ्लॅटमधील वेगळ्या खोलीत गेला. बराच वेळ परतला नाही, त्यामुळे सहकाऱ्यांनी खोलीत डोकावले असता करण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. पोलिसांनी माहिती मिळाताच घटनास्थळ गाठले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ न्यूज ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur a young man committed suicide by writing an emotional letter msr

ताज्या बातम्या