scorecardresearch

Premium

विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपूर कराराची होळी, केंद्र व राज्य सरकारचा निषेध

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारी नागपूर कराराची होळी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध केला.

Nagpur Agreement holi movement
विदर्भ राज्य झाले पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारला नागपूर कराराची होळी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध केला. व्हरायटी चौकातील गांधीपुतळा समोर समितीचे अध्यक्ष अरुण केदा यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी नागपूर कराराची होळी करण्यात आली.

Banana producers are aggressive
केळी उत्पादक राज्य सरकारविरोधात आक्रमक, रावेरमध्ये तीन ऑक्टोबरला आंदोलन
Ambadas Danve reaction flood Nagpur
“मुंबईची तुंबई म्हणून बदनामी, नागपूरचा पूर राजकीय अपयश”, अंबादास दानवेंचे विधान, म्हणतात..
Koradi Thermal Power Plant
नागपूर : कोराडी औष्णिक वीज प्रकल्प विस्तारीकरणावर उच्च न्यायालयाची केंद्र व राज्य सरकारला नोटीस
state council of ministers
UPSC-MPSC : राज्य मंत्रिमंडळाची रचना कशी असते?

आणखी वाचा-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडाऱ्यातील पत्रकारांकडून ढाब्यावर जेवणाचे निमंत्रण

२८सप्टेंबर १९५३ ला झालेल्या नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला बळजबरीने विदर्भाच्या जनतेची इच्छा नसताना महाराष्ट्रात सामील करून घेतले, नागपूर करारात दिलेल्या ११ कलमांपैकी बहुतांश कलमा पाळल्या गेल्या नाही म्हणून नागपूर करार हा संपुष्टात आला असून विदर्भातील जनतेचा बॅकलॉग वाढला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून ४७ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. बेरोजगारांची फौज वाढली, नक्सलवाद वाढला, कुपोषण वाढले आहे यापासून मुक्ती करता स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केंद्र सरकारने तात्काळ करावी अशी मागणी करत नागपूर कराराच्या प्रतीची होळी करण्यात आली. विदर्भ राज्य झाले पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. प्रभाकर कोडबंतुवर, मुकेश मासुरकर, अहमद पटेल आदी विदर्भवादी नेते उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur agreement holi movement by vidarbha state movement committee protest against central and state govt vmb 67 mrj

First published on: 28-09-2023 at 16:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×