scorecardresearch

Premium

नागपूर ‘एम्स’ला ‘एनएबीएच’ मानांकन, देशात पहिलेच रुग्णालय, पंतप्रधानांकडून अभिनंदन

नागपूर ‘एम्स’ने स्वच्छतेपासून इतर सर्वच सोयींवर विशेष लक्ष दिले. त्यामुळे ‘एम्स’ला नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सचे (एनएबीएच) मानांकन मिळाले आहे.

Nagpur AIIMS
नागपूर ‘एम्स’ला ‘एनएबीएच’ मानांकन, देशात पहिलेच रुग्णालय, पंतप्रधानांकडून अभिनंदन (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : नागपूर ‘एम्स’ने स्वच्छतेपासून इतर सर्वच सोयींवर विशेष लक्ष दिले. त्यामुळे ‘एम्स’ला नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सचे (एनएबीएच) मानांकन मिळाले असून, देशातील हे मानांकन असलेले नागपूर ‘एम्स’ पहिले रुग्णालय ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीसाठी अभिनंदन केले आहे.

रुग्णांवर चांगला उपचार करण्यासाठी ‘एम्स’ प्रशासन येथील स्वच्छता, शस्त्रक्रियेचे तंत्र, प्रयोगशाळेतील विविध तपासणी, रुग्णांना औषधांच्या दिल्या जाणाऱ्या चिठ्ठ्यांसह लहान- सहान गोष्टींवर लक्ष ठेवते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी ‘एनएबीएच’ मानांकनासाठी अर्ज केला. त्यांनाच यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले गेले. ‘एनएबीएच’ चमूने पहिल्या निरीक्षणानंतर ‘एम्स’मध्ये सुमारे २५ त्रुटी काढल्या होत्या. या त्रुटी दूर करून ‘एम्स’ने पुन्हा आपली बाजू मांडली. त्यानंतर हे मानांकन ‘एम्स’ला मिळाले आहे. दरम्यान, नागपूर ‘एम्स’ने ‘ट्विट’ करून ही माहिती सार्वजनिक केली होती. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक ‘ट्विट’ केले. त्यात पंतप्रधान म्हणाले, की या कामगिरीबद्दल ‘एम्स’ नागपूरच्या चमूचे अभिनंदन, ही कामगिरी करत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा एक मापदंड स्थापित केला आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Gunratna sadavarte
“गांधींचे विचार संपले, या देशात आता नथुराम…”, गुणरत्न सदावर्ते बरळले; म्हणाले, “भारताचे तुकडे…”

हेही वाचा – नागपूर: सत्ताप्राप्तीसाठी टीका करताना विवेक बाळगा! सरसंघचालक मोहन भागवत यांचा राजकीय पक्षांना सल्ला

गडकरींची भूमिका महत्त्वाची

नागपूर ‘एम्स’साठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीच जोर लावला होता. त्यानंतर नागपूर एम्सला झटपट शैक्षणिक वर्ग सुरू करण्यासह या प्रकल्पाच्या बांधकाम व रुग्णसेवेला गती देण्यासाठी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घातले, हे विशेष.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur aiims awarded nabh status first hospital in the country congratulated by prime ministers mnb 82 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×