नागपूर आणि बिबट्याचा वावर हे समीकरण आता नागपुरकरांना तसं नवीन नाही, पण तरीही शहरात बिबट्या दिसला तर ते दहशतीत येतात. शहरातील दाभा परिसरात बिबट्याने कायम दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. दाभा येथील तुलसी पार्क सेंट्रल शाळेजवळील कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर कैद झाल्याने वनखात्याने या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्री येथे कॅमेरा ट्रॅप लावण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात वाघ आल्याची बातमी पसरली. मात्र …

दाभ्याचा परिसर गोरेवाडा जंगलालगत असून या जंगलात बिबटे मोठ्या संख्येत आहेत. त्यामुळे बरेचदा दाभा आणि लगतच्या परिसरात बिबट्या दिसून येतो, हे नित्याचेच झाले आहे. रात्री दाभ्यातील तुलसी पार्क सेंटर शाळेजवळ कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला तेव्हा शहरात वाघ आल्याची बातमी पसरली. मात्र, वनखात्याची चमू त्याठिकाणी पोहोचला आणि तो वाघ नसून बिबट्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून बिबट्याच्या शोधासाठी रात्री कॅमेरा ट्रॅप लावण्यात येत आहेत.

जून २०२१ मध्ये शहरात अंबाझरी परिसरातून बिबट्या आला होता. तब्बल आठ दिवस तो शहरात वनखात्याच्या चमुला हुलकावणी देत फिरला. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये दोनदा अंबाझरी आयुध निर्माणी परिसरात बिबट्याने ठाण मांडले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये अंबाझरी जैवविविधता उद्यानात तो पर्यटकांना दिसला. तर डिसेंबर २०२१ मध्ये वाडी परिसरात त्याचा वावर होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur alert warning from forest department after leopard movement was seen in dabha area msr
First published on: 19-08-2022 at 11:53 IST