नागपूर : मध्य नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवारी बंटी शेळके यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेले काँग्रेसचे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच माजी मंत्री अनिस अहमद यांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाल्याने उमेदवारी अर्ज भरता आले नसल्याचे सांगण्यात येत असेल तरी राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या अनीस अहमद यांची वेळ चुकली की चुकवल्या गेली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेसने मध्य नागपूरमधून मुस्लीम समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मुस्लीम समाजावर अन्याय झाला असे सांगत अनिस अहमद यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढण्याचे निर्धार केला. त्यासाठी ते सोमवारी तातडीने मुंबईला गेले आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ते वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले देखील. पण, एक मिनिटे विलंब झाल्याने त्यांना अर्ज भरता आला नाही.

हेही वाचा…पटोलेंनी तिकीट विकले, काँग्रेसच्या ‘या’ माजी आमदाराच्या आरोपाने खळबळ

s

अनिस अहमद यांनी अनेकदा मंत्रीपद भूषवले आहे. त्यांनी पाचवेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासंबंधीचे नियम, बारकावे यांची निश्चित कल्पना आहे. असे असताना त्यांची वेळ चुकलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुस्लीम समाजाची सर्वांधिक मते काँग्रेसला जातात, असा अनुभव आहे. त्यामुळे अनिस अहमद हे मध्य नागपूरमधून रिंगणात असल्याचा सर्वाधिक नुकसान काँग्रेसचे बंटी शेळके यांना होणार होता. तर मुस्लीमांच्या मतांचे विभाजन होण्याचा धोका होता. तर मतांच्या विभाजनाचा फायदा साहजिक भाजप उमेदवार झाला असता. पण, ऐनवेळी अनीस अहमद यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने काँग्रेसला दिलासा तर भाजपला धक्का बसला आहे. या घडामोडीनंतर अनिस अहमद यांना खरच विलंब झाला की, ही राजकीय खेळी होती, अशी चर्चा रंगू लागली आहे.

हेही वाचा…सायबर गुन्हेगारांच्या टोळीकडे तब्बल १६५८ बँक खाती!  ५ कोटींपेक्षा जास्त रक्कम…

या मतदारसंघातून काँग्रेसकडून मुस्लीम आणि हलबा समाजाचा आग्रह होता. परंतु काँग्रेसने मागील निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झालेल्या बंटी शेळक यांच्यावर विश्वास टाकला. त्यामुळे मुस्लीम आणि हलबा समाजाची नाराजी आहे. याबाबत अनिस अहमद म्हणाले, मला सुरक्षा रक्षकांनी मुख्य प्रवेशद्वारावर अडवले. त्यांना आपण उमेदवार असल्याचे समजवून सांगण्यात वेळा गेला. त्यानंतर त्यांनी मला माझे वाहन कार्यालय परिसरात घेऊन जाण्यास परवानगी नाकारली. माझ्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे मला कक्षात पोहोचण्यास केवळ एक मिनिट विलंब झाला आणि अर्ज भरण्यास नकार देण्यात आला.

Story img Loader