विदेशी कंपन्यांसाठी मोबाईल गेमची निर्मिती

नागपूर : संत्रानगरी ही तशी नागपूर शहराची पहिली ओळख. मात्र यासोबत आपले शहर मोबाईल गेम सिटी म्हणून राज्यात नावारूपाला येत आहे. त्याचे खरे कारण म्हणजे अ‍ॅपल, ब्लॅकबेरी, सॅमसंग, प्लेबायसह इतर मोबाईल कंपन्यांसाठी मोबाईल गेम आणि अप्लिकेशन शहरात तयार होत आहेत. येथील अनेक माहिती तंत्रज्ञानातील कंपन्यांत तयार झालेले मोबाईल गेम अमेरिका, युरोपीयन देशात गाजत असून मोबाईल गेमच्या मागणीतही वाढ झाली आहे. राज्यात नागपूर मोबाईल गेिमग तयार करण्याचे केंद्र ठरले आहे. 

बालकांसह तरुणांना भुरळ घालणाऱ्या मोबाईलच्या नवनव्या गेमसाठी नागपूर आता देश विदेशात प्रसिद्ध झाले आहे. देशविदेशातील हजारो मोबाईल कंपन्यांसाठी शहरातील महिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवा पिढी मोबाईल गेम आणि त्याचे अ‍ॅप्लिकेशन तयार करीत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ युवा सांगतात की, भारतात बनवण्यात येणाऱ्या मोबाईल गेम आणि अ‍ॅप्लिकेशनला विदेशातील लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. मोबाईल गेम तयार करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. ९० टक्के मोबाईल गेमसाठी युनिटी, एचटीएमएल, फेझर अशा गेमचे तंत्रज्ञान वापरण्यात येते. अ‍ॅपल आणि अँड्रॉईड मोबाईल कंपन्याकडून सर्वाधिक गेिमगची मागणी असते.

कोणताही गेम तयार करताना त्याचे नाव निश्चित झाल्यावर फ्रेम डिझाईन केली जाते. त्यात कोणते एलिमेंन्ट, कॅरेक्टर लागणार याचा बारकाईने अभ्यास केला जातो. तयार करण्यात येणाऱ्या गेमचा फ्लो व किती लेव्हल राहतील अथवा प्रत्येक लेव्हलमध्ये कसे अपग्रेडेशन राहणार याची मांडणी केली जाते. नंतर डिझायनर चमू संबंधित ग्राफिक्स बनवते. त्याला हवे तसे डेव्हलप करते. यानंतर टेिस्टग टीम गेममध्ये असलेल्या त्रुटी दूर करते. कुठे गती कमी-जास्त हवी बनवलेल्या कळ (कीज) कशा काम करतील त्या कशा हव्या. यामध्ये थ्रीडी इफेक्टस् देखील असतात. प्रत्येक रिझॉल्युशनवर त्याची तपासणी होते. शेवटी त्याला लागणारे संगीत तयार करून अपलोड केले जाते. गेिमग तयार करणाऱ्या शहरात अनेक कंपन्या आहेत. काही कंपन्या आऊटसोìसग देखील करतात.

बाजारात मोबाईल गेम आणि अ‍ॅप्लिकेशनची नियमित मागणी असते. आम्ही युरोपियन आणि अमेरिकन कंपन्यांसाठी गेम तयार करीत असतो. भारतात बनवण्यात येणाऱ्या मोबाईल गेम आणि अ‍ॅप्लिकेशनला विदेशात मागणी आहे. नागपूर राज्यात गेिमगचे नवे केंद्र बनत आहे.

– तसीफ अन्वर, टेक्नोलॅब पिक्सल व्हॅल्यू.