Today Nagpur News Updates : नागपूर शहरात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर नागपूर महापालिकेने बुलडोझरने कारवाई केली. या बुलडोझर कारवाईबाबत नागपूर महापालिका आयुक्तांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. मात्र आयुक्तांनी या प्रकारासाठी राज्य शासनावर खापर फोडले. नागपूर येथील विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी समोर आल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेवून तत्कालीन केंद्री नागरी वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांना नागपूर विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची सूचना केली होती. आता अमरावती विमानतळाचे नामकरण करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. तेव्हा राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील, जिल्ह्यातील तसंच विदर्भातील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.

Live Updates

Nagpur Vidarbha Maharashtra News LIVE Today, 18 April 2025

21:12 (IST) 18 Apr 2025

गडचिरोलीतील बहुचर्चित हत्या प्रकरणाचा उलगडा, भाडेकरूच निघाला मारेकरी

जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कक्ष अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे (६४) यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर चौथ्या दिवशी यश आले. ...वाचा सविस्तर
19:36 (IST) 18 Apr 2025

राज्याच्या वनखात्याचे मंत्री नेमके कोण? ‘या’ राज्यमंत्र्यांचा किस्सा ऐकाल तर…

वनखात्याची धुरा तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन्हीवेळा यशस्वीरित्या पार पडली. त्यांच्या कार्यकाळातच खात्याचे अत्याधुनिकीकरण झाले. तत्पूर्वी या खात्याकडे फारसे कुणाचे लक्षही जात नव्हते. ...वाचा सविस्तर
18:38 (IST) 18 Apr 2025

मोदी सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करून काँग्रेसचे आंदोलन....

चंद्रपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या खासदार सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी व काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांविरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रातील मोदी सरकार आकसपूर्ण कारवाई करीत आहे. मोदी सरकारचा हा निर्णय लोकशाही परंपरेला घातक आहे. लोकसभेत प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्यांवर सुडबुद्धीने कारवाई करुन जनसामान्यांचा आवाज दडपण्याचा हा डाव आहे, असा आरोप करीत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आदेशावरून चंद्रपूर येथे जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून विरोध नोंदविण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले व चंद्रपूर जिल्हातील जनसामान्या नागरिक व कार्यकर्ते यांची न्याय्य मागणी लक्षात घेऊन सदर नेत्यांवरील कारवाई थांबविण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. या आंदोलनात ग्रामीण युवक काँग्रेसकडून निषेध व्यक्त करत मोदी सरकार विरोधात फलक दाखविण्यात आले.

18:20 (IST) 18 Apr 2025

उच्च न्यायालयाने ‘सिंगल यूज प्लास्टिक बॉटल’वरील प्रतिबंध हटविले...

मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात पर्यावरणासाठी हानिकारक अशा सिंगल यूज प्लास्टिक बॉटलच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला होता. ...सविस्तर बातमी
18:01 (IST) 18 Apr 2025

गर्भवती महिलेसह पतीला अमानुष मारहाण… घराच्या वादातून आशा वर्करनेच….

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेसह तिच्या पतीला मारहाण करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
17:53 (IST) 18 Apr 2025

नागपुरात तीन रुग्णालयाच्या समन्वयातून हिमोफेलियाग्रस्त मुलावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया… इतर रुग्णांनाही…

दुर्मिळ आजाराचा रुग्ण असल्यास शासकीय रुग्णालय परस्परांकडे बोट दाखवतात. परंतु नागपुरात एका हिमोफेलिया या दुर्मिळ आजाराच्या मुलावर तीन शासकीय रुग्णालयांनी समन्वयातून यशस्वी शस्त्रक्रिया केली व रुग्णाचे प्राण वाचवले. ...सविस्तर वाचा
17:44 (IST) 18 Apr 2025

सौगात ए मोदी : सिलिंडर ५० रुपयांनी महागले, नागपुरात आंदोलन

आधीच आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या जनतेला मोदी सरकारने महागाईची आणखी एक भेट दिली आहे. ...वाचा सविस्तर
17:32 (IST) 18 Apr 2025

शिक्षक भरती घोटाळ्यातील शाळांची यादी ‘लोकसत्ता’कडे….यात तुमच्या गावातील शाळा तर नाही…?

राज्यात खळबळ उडवणाऱ्या नागपूर विभागातील शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. ...सविस्तर बातमी
17:19 (IST) 18 Apr 2025

अखेर चाहता भेटलाच 'पुष्पा ' भाईला! अल्लू अर्जुन व अजयच्या भेटीचे नाट्य

जो आपल्या मनात ठसला, रात्रंदिवस ज्याची प्रतिमा जपतो, त्याची प्रत्यक्ष भेट घडली तर होणारा आनंद गगनात मावेनासा. तसेच अजय मोहिते या यू ट्यूबर व इनफ्लूएणझरबाबत घडले. ...अधिक वाचा
17:11 (IST) 18 Apr 2025

शिकार आणि शिकाऱ्याचा एकाच विहिरीत पडून मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा...

विहिरीतून बाहेर न पडता आल्याने दोघांचाही विहिरीतच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ...अधिक वाचा
17:10 (IST) 18 Apr 2025

व्याघ्र प्रकल्पातील १३ लाखाच्या नुकसान भरपाईवर मुलाचा डोळा…. अखेर पैशांसाठी जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने…

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. या भागातील आदिवासींना राज्य शासनाकडून नुकसान भरपाईपोटी मोठी रक्कम देखील देण्यात आली. ...वाचा सविस्तर
16:57 (IST) 18 Apr 2025

शेअर मार्केटमधून मोठ्या परताव्याचे आमिष, तर सावधान!; एक कोटीचे लक्ष्य…

शेअर मार्केटमधून मोठ्या परताव्याचे आम्हीच दिल्या जात असेल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे. अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. ...सविस्तर वाचा
16:44 (IST) 18 Apr 2025

महाराष्ट्रातील मेळघाटात दहा हजारांवर बालके कुपोषित, उपजत मृत्यूही...

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट अतिदुर्गम आदिवासी भागातील नोव्हेंबर २०२४ मध्ये १० हजारावर बालके कुपोषित असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. ...सविस्तर बातमी
16:43 (IST) 18 Apr 2025

‘स्केटिंग रिंक’ खासगी व्यक्तीच्या ताब्यात का?

गांधीनगर येथील महापालिकेच्या मैदानावरील ‘स्केटिंग रिंक’ संचलित करण्यासाठी ती खासगी व्यक्तीला देण्यास काही स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. ...सविस्तर बातमी
16:32 (IST) 18 Apr 2025

शेगावात केसगळतीपाठोपाठ नखगळतीचे संकट गडद, चार गावात ३७ रुग्ण

जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केसगळती व टक्कल या अनामिक व अजूनही पूर्णपणे निर्मूलन न झालेल्या आजाराची दहशत कायम आहे. ...सविस्तर बातमी
16:32 (IST) 18 Apr 2025

शेगावात केसगळतीपाठोपाठ नखगळतीचे संकट गडद, चार गावात ३७ रुग्ण

जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केसगळती व टक्कल या अनामिक व अजूनही पूर्णपणे निर्मूलन न झालेल्या आजाराची दहशत कायम आहे. ...सविस्तर बातमी
16:22 (IST) 18 Apr 2025

शिक्षकांचे ओझे हलके… आता शाळा स्‍तरावर चारच समित्‍या…

अनेक समित्या वर्ग करण्यात आल्या असून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आता केवळ चारच समित्या कार्यरत राहणार आहेत. ...सविस्तर बातमी
16:12 (IST) 18 Apr 2025

'किया'ची हार्वर्ड भरारी… एआय आधारित सॉफ्टवेअर संशोधन; अटॅक येण्यापूर्वीच हृदयविकार निदान…

मॅसेच्यूसेटस या केंद्रात किया उर्फ भार्गवी उमानाथ यादव ही भारतीय कन्या झळकली. ती दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाची वैद्यकीय शाखेत अंतिम वर्षात शिकत आहे. तिची प्रख्यात गुगल कंपनीतर्फे निवड झाली. ...वाचा सविस्तर
15:58 (IST) 18 Apr 2025

वाहनधारकांनो सावधान! उपराजधानीत तीन वर्षांत पाच हजारांवर वाहनांची चोरी

शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर म्हणून वाहनचोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत ५ हजार ३०० पेक्षा जास्त वाहने चोरी गेल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. ...अधिक वाचा
15:48 (IST) 18 Apr 2025

अमरावती : वाहनचालकांचा कोट्यवधींचा दंड थकीत

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलनाद्वारे दंड आकारण्यास पोलिसांनी सुरुवात केली असली तर वाहनचालकांनी मात्र असा दंड भरण्याकडे पाठ फिरवली आहे. ...सविस्तर बातमी
15:38 (IST) 18 Apr 2025

आंध्र प्रदेशातील भविकांच्या बसला अपघात, ३३ भाविक जखमी; मुस्लीम बांधवानी…

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात आंध्रप्रदेशमधील सुमारे ३३ भाविक जखमी झाले. त्यांच्यावर मलकापूर येथील उप जिल्हा रुग्णालय आणि बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...सविस्तर वाचा
14:08 (IST) 18 Apr 2025

सिमेंट रस्ते दिव्यांगासाठी अडचणीचे!,उच्च न्यायालयात...

दिव्यांगांच्या कायदेशीर अधिकारावर अडचण येत असल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेत दाखल करण्यात आला ...सविस्तर वाचा
13:14 (IST) 18 Apr 2025

महाराष्ट्र आगीच्या विळख्यात ! तीन महिन्यातच...

भारतीय वनसर्वेक्षणातून महाराष्ट्रात यावर्षी जंगलातील आगींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दर्शवत आहे. ...सविस्तर वाचा
12:35 (IST) 18 Apr 2025

चंद्रपूर : पाणी टंचाईमुळे दालमिया सिमेंट उद्योग बंद, प्रमुख नद्यांचे पात्र कोरडे

चंद्रपूर पैनगंगा नदी पात्रातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी टंचाईचा फटका दालमिया सिमेंट भारत लिमिटेड या उद्योग समुहाला बसला आहे. ...सविस्तर बातमी
11:26 (IST) 18 Apr 2025

तलाव व जलाशय सफाई करिता 'ॲक्वारोवर' रोबोटिकची निर्मिती

सौर ऊर्जा व बॅटरीवर चालणारे हे ॲक्वारोवर रोबोट पाण्याची गुणवत्ता आणि प्रदूषण पातळी व इतर मौल्यवान माहितीचे संकलन करण्यास मदत करणारे आहे. ...अधिक वाचा
11:16 (IST) 18 Apr 2025

Video : वाघाने पळवले वनमजुराचे कपडे, ताडोबाच्या बफर क्षेत्रातील हा प्रकार…

ताडोबातील एकूणच व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...अधिक वाचा
11:16 (IST) 18 Apr 2025

बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश, ही गावे घेणार मोकळा श्वास, होणार पुनर्वसन.

पुनर्वसन होण्याची बाब या पाच गावासाठी अत्यंत आनंदाची ठरली आहे. या सोबतच अन्य काही गावांची पण पुनर्वसन करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. ...सविस्तर वाचा
11:14 (IST) 18 Apr 2025

अमरावती विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव द्या, नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र

नागपूर येथील विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी समोर आल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेवून तत्कालीन केंद्री नागरी वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांना नागपूर विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची सूचना केली होती. ...सविस्तर वाचा
11:14 (IST) 18 Apr 2025

बुलडोझर कारवाईबाबत नागपूर महापालिकेची माफी…पण, न्यायालय माफी स्वीकारणार का ? कारण,…

शहरात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर नागपूर महापालिकेने बुलडोझरने कारवाई केली. ...अधिक वाचा
11:14 (IST) 18 Apr 2025

वरातीत नाचण्यावरून वाद, देऊळघाटमध्ये भाजप कार्यकर्त्याला मारहाण; दोन गटात तुंबळ हाणामारी

तालुक्यातील देऊळघाट येथे कही दिवसांपूर्वी एका लग्नात झालेला वाद आज, गुरुवारी पुन्हा उफाळून आला. यामुळे झालेल्या तुंबळ हाणामारीत सहा युवक गंभीर जखमी झाले. ...सविस्तर वाचा

Nagpur Breaking News Live Today in Marathi

नागपूर ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेट्स