“चंद्रशेखर बावनकुळे यांचा जीवनपट हा संघर्षाचा आहे. ऑटोरिक्षा चालविण्यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. विशेष म्हणजे, त्यांनी बायकोपण पळवून आणली आहे.”, असा गौप्यस्फोट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केला.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा वसंतराव देशपांडे सभागृहात सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

What Vishal Patil Said?
विशाल पाटील यांचा गंभीर आरोप, “मला चिन्ह मिळू नये म्हणून प्रयत्न झाले, तसंच माझं नाव..”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Chandrashekhar Bawankule,
धैर्यशील मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांचा…”
Devendra Fadnavis Comment on Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीसांची तुफान टोलेबाजी, “उद्धव ठाकरेंचे नेते कोण? राहुल गांधी, आता मुंबईकरांनी ठरवायचं आहे की..”

नागपूर : फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळेंना मुख्यमंत्री पदाची संधी – गडकरी

गडकरी म्हणाले, “बावनकुळेंनी बायको कशी पळवून आणली, त्यांनी कसं केलं ते तुम्हाला आता एकट्यात सांगतील. तरुणांसाठी ते गुपीत उपयोगाचे आहे. पण, ज्येष्ठांनी या भानगडीत पडू नये.”, असा सल्लाही गडकरींनी यावेळी दिला.

…या परीक्षेत ते यशस्वी झाले –

“बावनकुळे हे झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत. राज्यात ऊर्जा खात्याचे मंत्री असताना त्यांनी चांगले काम केले. तिकीट मिळाले नाही तरी पूर्ण ताकदीने पक्षासाठी त्यांनी काम केले. या परीक्षेत ते यशस्वी झाले. कार्यकर्त्यांमध्ये बावनकुळे आजही तेवढेच लोकप्रिय आहेत. पक्षाने त्यांना सेवा करण्याची संधी दिली आहे. आगामी काळात त्यांच्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. पक्ष मजबुतीचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे”., याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.