नागपूर: भारत- पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन देशात युध्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे आदेश सोमवारी दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनालाराज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी आम्ही आदेशाची प्रतीक्षा करीत असल्याचे सांगितले.

दोन्ही देशातील युध्दाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली स्वरक्षण सिध्दांत सर्वोच्च पातळीवर ठेवण्याच्या हेतूने देशभरातील २४४ जिल्ह्यातील अग्निशमन, नागरी संरक्षण, गृह रक्षक दलाला सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे २४४ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापनासह अन्य जिल्हास्तरीय प्राधिकरणे, गृह रक्षक दल, एनसीसी, एन एस एस. यांना युध्दसरावात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. या संदर्भात नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे म्हणाले, आम्ही राज्य सरकारच्या आदेशाची वाट बघत आहोत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात केंद्र, राज्य आणि निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांचा समावेश आहे. जिल्ह्याधिकारी हे या प्राधिकरणाचे प्रमुख असतात. नैसर्गिक, मानव निर्मित किंवा तत्सम स्थितीत ही यंत्रणा सक्रिय होते. पोलीस लष्कर विभागाची मदत ही यंत्रणा घेरे.भारत आणि पाकिस्तान मधील तणावाची स्थिती लक्षात घेता १९७७ नंरच्या युध्दानंतर प्रथम भारताने युध्द सरावाचा निर्णय घेतला आहे.

नागपूर देशाच्या मध्यस्थानी

नागपूर हे देशाच्या मध्यस्थानी असणारे शहर असून येथून देशाच्या चारही बाजूंनी दळणवळण सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे संवेदनशील शहराच्या यादीत नागपूचा समावेश होतो. समावेश होतो. नागपूरमध्ये सध्या कोणताही मोठा युद्ध सराव आयोजित केलेला नाही. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात मॉक ड्रिल अर्थात युद्ध सराव करण्याचे आदेश दिले आहेत. 

या आदेशानुसार, नागपूरमध्येही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि युद्ध सज्जतेसाठी मॉक ड्रिलचे आयोजन केले जाऊ शकते. तसेच, भारतीय नौदल आणि वायुदल देखील विविध ठिकाणी युद्ध सरावे करत आहेत.

मॉक ड्रिल

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, नागपूरमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मॉक ड्रिलचे आयोजन केले जाऊ शकते. यात सायरन आणि नागरिकांच्या बचावाचा सराव (मॉक ड्रिल) समाविष्ट असेल.