scorecardresearch

“कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचं आमिष दाखवून तरुणींना जाळ्यात ओढलं अन्…”, नागपूरमधील धक्कादायक प्रकार समोर

‘गुन्हे शाखेने छापा घालून दलालाला अटक केली तर मुलींनी देहव्यापार करताना ताब्यात घेतले.

sex-racket
पारशिवनीजवळील नयाकुंड परिसरात असलेल्या ड्रिमविला फॅमिली रेस्ट्रॉरेंट आणि लॉजिंग येथे सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट‘वर ग्रामीण पोलिसांनी छापा

नागपूर : कमी वेळात जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून एका दलालाने दोन तरुणींना जाळ्यात ओढले. दोघींनाही सेक्स रॅकेट’मध्ये ढकलले. बेलतरोडीतील नवनाथ सोसायटीतील श्रद्धा इन हॉटेलमध्ये  ‘गुन्हे शाखेने छापा घालून दलालाला अटक केली तर मुलींनी देहव्यापार करताना ताब्यात घेतले.

हेही वाचा >>> नागपूर : भारत वि.ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यासाठी मेट्रोची विशेष सेवा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्रनगरातील नवनाथ सोसायटीतील श्रध्दा इन हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. देहव्यापार सुरु असल्याची खात्री होताच पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहकाने दलाल निरज गणेश ठेंबरे (वय २६, रा. रामेश्वरी, भीमनगर, अजनी, नागपूर)याच्याशी संपर्क साधला.त्याने श्रध्दा इन हॉटेलवर खोली बूक केली.ग्राहकाने हॉटेलवर जाताच पोलिसांनी छापा घातला. यावेळी पोलिसांनी दोन मुलींचा सुटका केली. आरोपी निरज ठेंबरे याने पैशाचे आमिष दाखवून दोन मुलींकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आरोपीविरूध्द बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 20:33 IST