करोनामुळे १४ जणांचा मृत्यू ; तिसऱ्या लाटेत प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

तिसऱ्या लाटेत प्रथमच दिवसभरात नव्या रुग्णांपेक्षा चार हजारावर रुग्ण करोनामुक्त झाले.

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत तब्बल १४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली असली तरी गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी म्हणजे २,८७१ नवीन रुग्ण आढळले. तिसऱ्या लाटेत प्रथमच दिवसभरात नव्या रुग्णांपेक्षा चार हजारावर रुग्ण करोनामुक्त झाले.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या चार हजाराच्या जवळपास राहात होती. गुरुवारी शहरात २ हजार २७, ग्रामीणमध्ये ७५५ तर जिल्ह्याबाहेर ८९ असे एकूण २ हजार ८७१ नवीन रुग्ण आढळले. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ८३ लाख ३४१, ग्रामीण १ लाख ५८ हजार १९०, जिल्ह्याबाहेरील ८ हजार ६२९ अशी एकूण ५ लाख ५० हजार १६० रुग्णांवर पोहचली. तर दिवसभऱ्यात शहरात १०, जिल्ह्याबाहेरील ४ असे एकूण १४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ५ हजार ९५५, ग्रामीण २ हजार ६०८, जिल्ह्याबाहेरील १ हजार ६४० अशी एकूण १० हजार २०३ रुग्णांवर पोहचली. दरम्यान, शहरात २४ तासांत ५ हजार ९१०, ग्रामीणला १ हजार ७६९ अशा एकूण ७ हजार ६७९ संशयितांच्या चाचण्या झाल्या. त्यामुळे कमी चाचण्यांमुळे रुग्णसंख्या कमी दिसत असल्याचा या क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे.

करोनामुक्तांचे प्रमाण ९२.९८ टक्के

शहरात तिसऱ्या लाटेत प्रथमच ३ हजार ११८, ग्रामीणला १ हजार १५३, जिल्ह्याबाहेरील १०२ असे एकूण ४ हजार ३७३ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ८३ हजार ३४१, ग्रामीण १ लाख ४८ हजार ६६४, जिल्ह्याबाहेरील ६ हजार ८७५ अशी एकूण ५ लाख ११ हजार ५५५ व्यक्तींवर पोहचली. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९२.९८ टक्के आहे.  शहरात २१ हजार ३६९, ग्रामीणला ६ हजार ९१८, जिल्ह्याबाहेरील ११५ असे एकूण जिल्ह्यात २८ हजार ४०२ सक्रीय उपचाराधीन  रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी शहरात असलेल्या सक्रीय करोनाग्रस्तांचे प्रमाण ७५.२३ टक्के आहे, हे विशेष. 

विदर्भात ८ दगावले

नागपूर वगळता विदर्भात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला तर २२४२ नवे बाधित आढळून आले. मृत्यूमध्ये अमरावतीत तीन, गोंदियात दोन तर भंडारा, चंद्रपूर आणि वर्धा येथे प्रत्येकी एक मृत्यूचा समावेश आहे. बाधितांमध्ये अकोला १२३, वाशीम १४९, बुलढाणा २४३, वर्धा ५१, चंद्रपूर ४३८, गडचिरोली १८२, अमरावती ४६०, गोंदिया ११७, भंडारा १९१ आणि यवतमाळ जिल्ह्यातील २८८ रुग्णांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur district reports 14 deaths and 2871 new covid 19 case zws

Next Story
चळवळीतील कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा मागदर्शक काळाच्या पडद्याआड
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी