Premium

नागपूरच्या सीताबर्डी भागात प्लॅस्टिक दुकानाला भीषण आग, लाखोंचं नुकसान

नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमधील एका प्लास्टिक दुकानाला रविवारी सकाळी आग लागली असून यात संपूर्ण दुकान खाक झाले.

Fire at a plastic shop in Bardi
सीताबर्डीत प्लॅस्टिकच्या दुकानाला आग

नागपूर : नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमधील एका प्लास्टिक दुकानाला रविवारी सकाळी आग लागली असून यात संपूर्ण दुकान खाक झाले. सकाळी आठच्या सुमारास ही आग लागल्याने या भागात खळबळ उडाली. दुकानातूनमोठा धूर निघत होता. त्यानंतर आगीचे लोळ बाहेर पडू लागले. आजूबाजूलाही दुकाने होती. त्यांनाही आगीची झळ पोहोचली. हा संपूर्ण भाग बाजारपेठेचा आहे.आज रविवार असल्याने व सकाळची वेळ असल्याने दकाने बंद होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या च्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.आग विझविण्यात यश आले. आग पसरली असती मोठी घटना घडली असती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 09:43 IST
Next Story
लोकसभेचे पडघम : विरोधकांची जोरदार तयारी; शिवसेना ठाकरे गट मात्र अंतर्गत गटबाजीत अडकला