नागपूर : तुमच्यावर देवीचा कोप झाला आहे, ती तुमच्यावर नाराज आहे, त्यामुळे तुमची आई आजारपणामुळे अंथरुणाला खिळली आहे… अशी भीती दाखवत भोंदू ज्योतिष्य बनून आलेल्या दोघांनी महिला आणि त्यांच्या सोबतच्या एका नातेवाईकाकडून पाच तोळे सोन्याचे दागीने लंपास करत पळ काढला. इमामावाडा पोलीस हद्दीतील मेडिकल चौकातील व्हीआर मॉलच्या शेजारून रामबागकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी भल्या सकाळी १० च्या सुमारास ही धक्कादायक घटना.
सुजाता भगवानलाल अगरवाल असे भोंदू ज्योतिष्याच्या भूलथापांना बळी पडून पाच तोळे सोन्याचे दागीने गमावून बसलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. सुजाता या रामबाग वस्तीकडील घराकडे परत जात असताना सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
नेमकी घटना काय घडली?
सुजाता भगवानलाल अगरवाल यांची मुलगी रामबाग जवळच्या एका इमारतीत राहते. त्या मुलीला भेटण्यासाठी घरी जात होत्या. आजारपणामुळे सुजाता यांच्या आई देखील रुग्णालयात दाखल आहेत. त्या रुग्णालयातून मुलीच्या घरी जात असताना ज्योतिष्य बनून पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांना एका घराजवळ गाठले. तुमच्यावर देवीचा हा प्रकोप झाला आहे. त्यामुळेच तुमच्या घरामागे दवाखाना लागला आहे, अशी भिती या दोघांनी दाखवली. दम्यान या दोघांनी देवीचा थांबवायचा असेल, तर हातातल्या सोन्याच्या बांगड्या आणि सोनसाखळी तातडीने पिशवीत काढून ठेवा. असे सांगितले. आईच्या आजारपणाची त्यांना कशी माहिती झाली, यावर सुजाता यांचा विश्वास बसला.
अन् दागिने घेऊन भोंदूंचा पोबारा…
सुजारा अगरवाल यांनी भोंदू ज्योतिष्याने सांगितल्या प्रमाणे हातातील चार तोळे सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यातील सोनसाखळी काढून पिशवीत ठेवली. नंतर दोघांनी त्यांना डोळे बंद करून २० पावले मागे जाण्यास सांगितले. २० पावलं होई पर्यंत पाठीमागे वळून पाहू नका असेही दोघांनी त्यांना सांगितले. तोच पिशवीची अदलाबदल करत दागीने घेऊन भोंदू ज्योतिष्यांनी पळ काढला. हा सगळा घटनाक्रम जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाला असला तरी त्यातील चेहरे अंधूक आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
