नागपूर : शालेय वयात असतानाच तिचे वस्तीतील युवकाशी सूत जुळले. त्याने तिला दारू, सिगारेटचे व्यसन लावले. त्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या मुलीने त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. डॉक्टरकडे जाण्याऐवजी तिने कुटुंबीयांपासून ही बाब लपवून ठेवली. नऊ महिने होण्यापूर्वीच मुलीने ‘यू-ट्यूब’वर बघून स्वत:ची प्रसूती केली. बाळाचा गळा आवळून खून केला. तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा धक्कादायक प्रकार नागपुरातील अंबाझरी परिसरात घडला.

हेही वाचा >>> वॉट्सॲपवर ओळखी, सांगलीचा आरोपी, कोल्हापुरात बलात्कार अन् वर्धेत गुन्हा दाखल

8 year old girl raped in andhra pradesh Crime news
धक्कादायक! शाळेतील मित्रांकडूनच आठ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; श्वान पथकाने आरोपींचा ‘असा’ काढला माग
case has been registered in the death of two children due to suffocation in a motor vehicle
मुंबई : मोटरगाडीमध्ये गुदमरून दोन बालकांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
court sentence life imprisonment till death for molesting minor girl zws
अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार; शेजाऱ्याला मृत्यूपर्यंत जन्मठेप तर आजोबाला १० वर्षे सक्तमजुरी
Contract doctor dismissed in case of child death in gadchiroli 
गडचिरोली : उपचारात हलगर्जीपणा भोवला ! बालकाच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटी डॉक्टर बडतर्फ; लोकसत्ताच्या वृत्ताची दखल
bhaindar municipal corporation marathi news
भाईंदर: पालिकेच्या प्रकल्पातील खड्ड्यात मुलाचा मृत्यू, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल
Rape Bid By Father
पॉर्न पाहण्याचं व्यसन लागलेल्या बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, नंतर केली हत्या; पोलिसांनी केली अटक
Boyfriend Stabs Girlfriend
“…तर आरती यादव वाचली असती”, पोलिसांवर आरोप करत पीडितेच्या आई-बहिणीने फोडला टाहो
Assam Home Secretary Shiladitya Chetia commits suicide after wife death
पत्नीच्या मृत्यूनंतर आसामच्या गृहसचिवांची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय मुलगी नववीत शिकते. तिची आई एका मॉलमध्ये नोकरी करते. वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवर तिची ठाकूर नावाच्या युवकासोबत ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांचे सूत जुळल्यानंतर भेटीगाठी वाढल्या. त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातच त्याने तिला दारू, सिगारेटचे व्यसन लावले. त्याच्या प्रेमात मुलगी वेडी झाली. ती गर्भवती झाली. तिने आपल्या प्रियकराला ही बाब सांगितली. त्याने लगेच हात झटकले आणि ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. त्याची मनधरणी करण्यातच ३ महिन्यांचा कालावधी निघून गेला.

हेही वाचा >>> खळबळजनक! सुनेच्या प्रियकराचा सासूवर बलात्कार

आईला माहिती झाल्यास घराबाहेर काढणार अशी तिला भीती होती. त्यामुळे आणखी तीन महिन्यांपर्यंत तिने आईपासून ही गोष्ट लपवून ठेवली. त्यानंतर तिने बाळाला जन्म देऊन विल्हेवाट लावण्याचे ठरवले. तिने ’यू-ट्यूब’वर प्रसूती कशी करावी, याबाबत अनेक चित्रफिती बघितल्या. प्रसूतीसाठी लागणारे सर्व साहित्य विकत घेतले. त्यानंतर तिने शुक्रवारी लपवून ठेवलेले साहित्य बाहेर काढले. यू-ट्यूब बघून तिने स्वत: प्रसूती केली. बाळाला जन्म दिला. बाळामुळे बदनामी होईल या भीतीपोटी तिने बाळाचा गळा आवळून जीव घेतला. रात्री नऊला तिची आई कामावरून घरी परतली. आईला तिने घडलेला प्रकार सांगितला. आईने तिला रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी बाळाच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तसेच तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या ठाकूर नावाच्या युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपी ठाकूरचा शोध घेत आहेत.