नागपूर : सोन्याचे दर २४ कॅटेरमध्ये जीएसटी व मेकींग शुल्क वगळून एक लाख रुपये प्रति दहा ग्रामवर पोहचल्यावर काही दिवसांनी चांगलेच घसरले होते. परंतु त्यानंतर पून्हा दर वाढत आहे. गुरूवारी (३ जुलै २०२५) सोन्याचे दर बाजार उघडल्यावर पहिल्या तासातच वाढण्याचे संकेत होते. परंतु त्यानंतरच्या तासात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.
नागपुरातील सराफा बाजारात १३ जुनला जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून सोन्याच्या दराने २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या दिवशी नागपुरात दुपारी प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी १ लाख रुपये रुपये, २२ कॅरेटसाठी ९३ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७८ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ६५ हजार रुपये नोंदवले गेले. हे दर ३ जुलै २०२५ रोजी सकाळी बाजार उघडल्यावर १०.३० वाजता प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९७ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार ६०० रुपये होते. हे दर एक तासांनी ११.३० वाजता वाढून प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९८ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार ७०० रुपये होते. हे दर आणखी एक तासांनी १२.३० वाजता घसरून प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९७ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९० हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे आता सोन्याचे दर आणखी घसरण्याचे संकेत दिसत आहे.
चांदीच्या दरातही…
नागपुरातील सराफा बाजारात मेकिंग व जीएसटी शुल्क वगळता चांदीचे दर प्रति किलो ३ जुलैला सकाळी १०.३० वाजता १ लाख ७ हजार ५०० रुपये होते. हे दर १ तासांनी ११.३० वाजता प्रति किलो १ लाख ८ हजार ३०० रुपये तर त्यानंतर तासभरांनी १२.३० वाजता १ लाख ८ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरातही प्रत्येक तासात बदल बघायला मिळत आहे. सोने- चांदीच्या दरातील बदलामुळे ग्राहकांमध्ये खरेदीबाबत संभ्रम आहे.