नागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘ग्रोथहब’साठी पाच वर्षात पाच हजार कोटी रुपये मिळणार असून त्याचा फायदा मुंबई, पुण्यासह नागपूर महानगरालाही होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले याचे विवरण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानुसार केंद्र सरकारकडून प्रत्येक वर्षी पाच हजार रुपये असे पाच वर्षात मिळणार आहे. याचा फायदा मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआर), पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि नागपूर महानगर विकास प्राधिकरणालाही होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.

या शिवाय पायाभूत सुविधा क्षेत्रात होणारीन १२ लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्सव्यवसाय आणि सिंचनासाठी केलेली भरीव तरतुदीचाही फायदा राज्यासह विदर्भाला होण्याची शक्यता आहे. महिला बचत गटासाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्वाची आहे.

प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहाची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्आलयात आताप चिकित्सा व्यवस्था उभी करण्यासाठी घेतलेला निर्मय आरोग्य क्षेत्रात महत्वाचा ठरणारा आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, उद्योग रोजगारनिर्मिती वाहतूक, लॉजेस्टिक आणि शहरी विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. या निधीमुळे विदर्भात आर्थिक केंद विकसीत होईल. यामुळे आगामी काळात रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूरला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा हा निर्णय असल्याचे मत एक्सएसआयओ डंडस्ट्रियल पार्कचे संचालक आशीष अग्रवाल यांनी व्यक्त केले. मेट्रोसाठी अर्थसंकल्पात ५२० कोटी रुपये मिळाले आहे. यामुळे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला चालना मिळण्याची शक्यता आहे.